मुलाने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचत वडिलांकडून उकळले पैसे, तपासात धक्कादायक कारण समोर

Fake Kidnap: वसई येथे राहणाऱ्या एका 20 वर्षीय मुलाने आपल्या अपहरणाचे खोटे नाटक करत वडिलांकडून 30 हजार रूपये उकळल्याचे प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात या प्रकरणातील खरं कारण समोर आले आहे.

Palghar Crime News : वसई येथे राहणाऱ्या एका 20 वर्षीय मुलाने कथित रूपात आपल्या वडिलांकडून पैसे उकळण्यासाठी स्वत:चेच अपहरण झाल्याचे खोटे नाटक केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी रविवारी (10 डिसेंबर, 2023) सांगितले की, वाळीव पोलीस स्थानकात फादरवाडी परिसरातील एका स्थानिक रहिवाशाने आपला मुलगा 7 डिसेंबर (2023) रोजी घरातून बाहेर पडला आणि तो पुन्हा घरी आलाच नसल्याची माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणी 8 डिसेंबर (2023) रोजी मुलगा हरवल्याची तक्रार दाखल केली.

वाळीस पोलीस स्थानकातील एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले, "तपासादरम्यान तक्रारकर्त्यांनी म्हटले त्यांना त्यांच्या मुलाचा फोन आला होता. मुलाने वडिलांना फोनवरून सांगितले की, तीन लोकांनी त्याचे अपहरण केले आहे आणि मी त्यांच्या कैदेत आहे. अपहरणकर्ते 30 हजार रूपयांची मागणी करत आहेत. पैसे न दिल्यास ते माझा जीव घेतली हे देखील मुलाने वडिलांना फोनवरून सांगितले. पैसे पाठवण्यासाठी मुलाने वडिलांना एक क्यूआर कोडही (QR Code) पाठवला होता."

या प्रकरणाच्या अधिक तपासासाठी चार पोलिसांची एक टीम तयार करण्यात आली. पोलिसांच्या या टीमने वसई, विरार, नालासोपारा आणि अन्य ठिकाणी मुलाचा शोध घेण्यास सुरुवात केली. वेगवेगळ्या पुराव्यांवर काम केल्यानंतर शनिवारी (9 डिसेंबर, 2023) पोलिसांनी मुलाला वसई फाटा येथून शोधून काढले. पोलिसांनी मुलाची चौकशी केली त्यावेळेस कळले, मुलाला बाइक दुरूस्त करण्यासाठी 30 हजार रूपये हवे होते. वडिलांकडे बाइक दुरूस्त करण्यासाठी पैसे मागितल्यानंतर त्यांनी ते देण्यास नकार दिला होता. 

पोलिसांच्या प्राथमिक तपासात हे  देखील समोर आले की, मुलाने स्वत:हूनच आपले अपहरण झाल्याचे खोटे नाटक केले होते. या प्रकरणी पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले असून पुढील तपास करत आहेत. मुलाने वडिलांना जो क्यूआर कोड पाठवला होता तो मुलाच्या ओळखीच्याच व्यक्तीचा होता. तसेच वडिलांना मुलाने जो क्यू आर कोड पाठवला होता त्यावर त्यांनी पैसे पाठवले नव्हते. 

आणखी वाचा: 

Palghar : पालघरमध्ये अल्पवयीन मुलीची गळा दाबून हत्या, आरोपींना अटक

Pushpa : The Rise मधील अभिनेत्याला अटक, ज्युनिअर आर्टिस्टचा छळ केल्याचा गंभीर आरोप

SHOCKING! शेजाऱ्याची हत्या करणाऱ्या 'मधुबाला' मालिकेतील या अभिनेत्याला बेड्या

Share this article