
नवी दिल्ली (१० ऑक्टोबर): ज्ञानेश कुमार (Gyanesh Kumar) यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशभरात आंदोलनांनी जोर धरला आहे. हे आंदोलन फक्त कर्नाटक आणि दिल्लीपुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर देशाच्या इतर भागांतही पसरलं आहे.
उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये सुरू असलेल्या अशाच एका आंदोलनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल होतोय. नेमकं काय घडलं ते पाहूया. लखनौच्या एका प्रमुख ठिकाणी आज निदर्शने सुरू होती. मीडिया आपलं कव्हरेज करत होता आणि पोलीस तिथे बंदोबस्तासाठी तैनात होते.
आंदोलनाला हिंसक वळण लागल्यावर पोलिसांनी साहजिकच परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांना ताब्यात घेऊन गाडीत बसवण्याची कारवाई सुरू होती. याच वेळी एका पोलीस अधिकाऱ्याने एका तरुणाला चक्क आपल्या खांद्यावर उचलून आणलं. हे दृश्य अगदी 'बाहुबली' सिनेमातल्या सीनसारखं वाटत होतं. पोलिसाच्या खांद्यावर असलेला तो तरुण ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात संताप व्यक्त करत होता आणि जोरात घोषणाबाजी करत होता.
कोणाच्याही मदतीशिवाय या पोलीस अधिकाऱ्याने त्या तरुणाला उचलून थेट पोलिसांच्या गाडीकडे नेलं. व्हिडिओ पाहताना आपल्याला वाटतं की आता तो त्याला गाडीत बसवेल, पण तिथेच त्याने मोठी चूक केली. तरुणाला गाडीजवळ नेऊन त्याने त्याला जोरात जमिनीवर आपटलं. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर खळबळ माजवत आहे. हे पाहिल्यानंतर अनेकांनी पोलिसाच्या या कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
बाहुबलीसारखं उचलून नेणारा तो पोलीस अधिकारी हिरो ठरला असता. पण शेवटी त्याने तरुणाला ज्या निर्दयीपणे फेकून दिलं, ते पाहून लोक संताप व्यक्त करत आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय. पोलिसांनी फेकून दिलेल्या त्या तरुणाची अवस्था आता कशी आहे किंवा त्याला दुखापत झाली आहे का, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
Bade dukh ke sath hansna pad raha hai...😂😂
Ye Yogi ji ki Police hai, mazaak nhi😂 https://t.co/y6YSeEJOz2
— Indic_Vibhu (@Hindu_Tradition) October 10, 2026
निवडणूक आयोग (Election Commission), ज्ञानेश कुमार आणि मतदार यादी पुनरावृत्ती (SIR : special intensive revision) या मुद्द्यांवरून सध्या देशभरात मोठा गदारोळ सुरू आहे. मतदार यादीच्या पुनरावृत्तीत गैरप्रकार झाल्याचा आरोप काँग्रेससह अनेकांनी केला आहे. ८ ऑक्टोबर रोजी बंगळुरूमध्ये प्रसिद्ध यूट्यूबर आणि 'जिरळे पक्षा'चे (Jirale Paksha) प्रमुख अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखाली एक मोठं आंदोलन झालं. बंगळुरूनंतर आज दिल्लीतही निदर्शने झाली. एवढंच नाही तर उत्तर प्रदेशातही याविरोधात आंदोलने सुरू आहेत.