
महाराष्ट्रातील श्रीरामपूरमध्ये बेलापूर रोडवर एका तरुणीचा जीव थोडक्यात वाचला. एका भरधाव ट्रकने तिच्या स्कूटीला जोरदार धडक दिली. पण या तरुणीने क्षणाचाही विलंब न लावता थेट ट्रकचा पुढचा बंपर घट्ट पकडला. त्यामुळे ती ट्रकच्या महाकाय चाकांखाली येण्यापासून बचावली. या अंगावर काटा आणणाऱ्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे.
वाळूने भरलेला एक ट्रक वेगात वळणावर आला आणि त्याने समोरून येणाऱ्या स्कूटीला थेट धडक दिली. या धडकेत स्कूटी रस्त्यावर आदळली आणि तरुणी चालत्या ट्रकच्या अगदी जवळ फेकली गेली.
जाको रखे साईंया मार सके न कोई..
#Maharashtra अहिल्यानगर के श्रीरामपुर के बेलापुर रोड पर एक तेज़ रफ़्तार रेत से भरे ट्रक ने एक स्कूटी को ज़ोरदार टक्कर मार दी..हादसे में स्कूटी पर सवार युवती बाल-बाल बच गई..घटना का चौकानेवाला CCTV आये सामने
@TNNavbharat
@NagarPolice https://t.co/e7TjP3sXvc
— Atul singh (@atuljmd123) October 10, 2026
अपघातानंतर विचार करायला अजिबात वेळ नव्हता. अशा वेळी तरुणीने प्रसंगावधान दाखवत चालत्या ट्रकचा बंपर पकडून ठेवला. तिच्या या चपळाईमुळेच ती ट्रकच्या चाकांखाली चिरडली जाण्यापासून वाचली.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला हा थरार पाहून अंगावर काटा येतो. संकटाच्या वेळी दाखवलेले प्रसंगावधान माणसाचा जीव कसा वाचवू शकते, हे या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
सुदैवाने या अपघातातून सुखरूप बचावल्यानंतर, तरुणी स्वतः उठून उभी राहिली आणि तिने आपली नुकसान झालेली स्कूटी रस्त्याच्या बाजूला घेण्याचा प्रयत्न केला.
धक्कादायक बाब म्हणजे, अपघातानंतर ट्रक चालकाने तरुणीला मदत करण्याऐवजी गाडीतून खाली उतरून तिच्याशीच वाद घालायला सुरुवात केली. रस्त्यावर सुरू असलेला हा वाद पाहून स्थानिक नागरिक आणि वाटसरू तिथे जमा होऊ लागले. लोकांची गर्दी वाढताना पाहून ट्रक चालकाने तिथून पळ काढला.