जयपुरमध्ये हत्याकांडने खळबळ, एकाच घरातील तिघांची हत्या केल्यानंतर आरोपीने Reel तयार केल्यानंतर स्वत:ही दिला जीव

Published : Jun 06, 2024, 10:53 AM IST
death of newborn baby

सार

जयपुर येथील हत्याकांडाने सध्या खळबळ उडाली आहे. येथे एकाच घरातील तीन जणांची हत्या केल्यानंतर आरोपीने देखील रेल्वेखाली आपला जीव दिला आहे. नक्की काय घडले आणि प्रकरण काय जाणून घेऊया सविस्तर...

Crime News : जयपुर येथे बुधवारी (5 जून) रात्री एकाच घरातील तिघांची हत्या करण्यात आल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. येथील एका आईने आपल्या दिराकडे दोन मुलांच्या जीवाची भीक मागत राहिली. पण दिराने दोन मुलांचा त्यांच्या आईसमोरच जीव घेतला. यानंतर दिराने महिलेची देखील हत्या केल्यानंतर स्वत:ही ट्रेनच्या समोर जीव दिला. झोटवाडा पोलीस स्थानकातील ही घटना आहे. आरोपीने जीव देण्यासाठी रिल तयार केली आणि लिहिले की आजची रात्र शेवटची आहे.

नक्की काय आहे प्रकरण?
झोटवाडा पोलिसांनी म्हटले की, घटनेत 11 वर्षीय दिव्यांशी आणि एका वर्षीय सूर्य प्रताप नावाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. महिला शकुंतला उर्फ बेबी कंवरची स्थिती गंभीर असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. शकुंतलाचा पती लक्ष्मण आपल्या कार्यालयात होता आणि दिर रघुवीर रात्रीच घरी आला. यावेळी रघुवीरने किचनमध्ये जाऊन वहिनी शकुंतलाच्या पाठीसह पोटावर चाकूने हल्ला केला. यानंतर दुसऱ्या खोलीत जाऊन भाचा आणि भाचीची हत्या केल्यानंतर घराचा दरवाजा बंद करुन घटनास्थळावरुन निघून गेला. यानंतर कनपुरा फाटकजवळी ट्रेनसमोर रघुवीरने आत्महत्या केली.

पोलिसांनी दिली घटनेची अधिक माहिती
पोलिसांनी म्हटले की, परिवारामध्ये वाद सुरु होते. याच कारणास्तव हत्याकांड झाल्याचे प्रकरण घडले. हत्या आणि आत्महत्या करण्याआधी रघुवीरने सोशल मीडियावर रिल तयार रुन पोस्ट केली होती. यामध्ये लिहिले होते की, आज अखेरची रात्र असून गुड बाय जिंदगी.

आणखी वाचा : 

कळंबा कारागृहात मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपीचा खून

फरार बिल्डर विशाल अग्रवालच्या पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून मुसक्या आवळल्या

PREV

Recommended Stories

गुजरात हादरलं! साडीवरून झालेल्या वादातून लग्नाच्या दिवशीच होणाऱ्या पतीने केला वधूचा खून
Sangali Crime : सांगली हादरली! राजकीय पदाधिकाऱ्याचा वाढदिवसाच्या कार्यक्रमात खून