कळंबा कारागृहात मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपीचा खून

Published : Jun 02, 2024, 02:10 PM IST
crime 2.jpg

सार

कैद्यांमधील मारामारीचा प्रकार लक्षात येताच सुरक्षा रक्षकांनी धाव घेऊन संशयित हल्लेखोरांना ताब्यात घेतले. 

१९९३ मधील मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोजकुमार भवरलाल गुप्ता (वय ७०) याचा कळंबा मध्यवर्ती कारागृहात पाच कैद्यांनी ड्रेनेजचे लोखंडी झाकण डोक्यात घालून निर्घृण खून केला. ही घटना रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास कारागृहातील आंघोळीच्या हौदावर घडली. याप्रकरणी कारागृहातील न्यायालयीन बंदी प्रतीक उर्फ पिल्या सुरेश पाटील, दीपक नेताजी खोत, संदीप शंकर चव्हाण, ऋतुराज विनायक इनामदार आणि सौरभ विकास सिद्ध या पाच जणांची चौकशी जुना राजवाडा पोलिसांकडून सुरू आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटातील आरोपी मोहम्मद अली खान हा कळंबा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. रविवारी सकाळी तो आंघोळीसाठी कारागृहातील हौदावर गेला. त्याठिकाणी आधीच थांबलेल्या कैद्यांसोबत त्याचा वाद झाला. वादाचे रुपांतर मारामारीत झाले. त्यावेळी न्यायालयीन बंदी प्रतीक पाटील, दीपक खोत, संदीप चव्हाण, ऋतुराज इनामदार आणि सौरभ सिद्ध यांनी ड्रेनेजवरील लोखंडी झाकण काढून खान याच्या डोक्यात घातले. वर्मी घाव लागल्याने खान जागेवरच कोसळला.

कैद्यांमधील मारामारीचा प्रकार लक्षात येताच सुरक्षा रक्षकांनी धाव घेऊन संशयित हल्लेखोरांना ताब्यात घेतले. घटनेची माहिती मिळताच जुना राजवाडा पोलिसांनी कारागृहात जाऊन पंचनामा केला. गेल्या दीड ते दोन महिन्यात शंभराहून अधिक मोबाइल सापडल्याने कळंबा कारागृहाचा कारभार चव्हाट्यावर आला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष तपासणी मोहीम राबवून ११ कर्मचाऱ्यासह दोन अधिकाऱ्यांना बडतर्फ केले, तर दोन अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या होत्या. त्यानंतरही कळंबा कारागृहातील गैरप्रकार थांबलेले नाहीत.

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

Pune Crime : पुण्यात स्पा सेंटरवर छापा; उडी मारलेल्या महिलेचा मृत्यू, व्यवस्थापक गंभीर जखमी
Chhatrapati Sambhajinagar Crime : मोबाईल तक्रारीतून ओळख, प्रेमाच्या आमिषाने अत्याचार; छत्रपती संभाजीनगरात पीएसआयविरुद्ध गुन्हा