IIT Bombay, Student Sahil Wakode’s case | रवींद्र वाकोडे: साहिल प्रकरणी आरोपींना अटक करा

IIT Bombay, Student Sahil Wakode’s case | रवींद्र वाकोडे: साहिल प्रकरणी आरोपींना अटक करा

Published : Sep 23, 2026, 03:03 PM IST

IIT बॉम्बेचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या मृत्यूप्रकरणी त्याचे वडील रवींद्र वाकोडे यांनी संबंधित आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली. साहिलला जातीय छळाला सामोरे जावे लागले आणि आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले, असा आरोप त्यांनी केला. या प्रकरणात अॅट्रॉसिटी अॅक्ट आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत FIR नोंद असल्याचे त्यांनी सांगितले. रवींद्र वाकोडे यांनी शिरीष केदारे आणि सूर्यनारायण डुल्ला यांची नावे घेत त्यांना अटक करण्याची मागणी केली. साहिलने 13 तारखेला आपल्याला जातीय छळाबाबत सांगितल्याचा दावा त्यांनी केला. दोन-तीन महिन्यांपासून हा त्रास सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले. साहिलने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाल्याचा आरोपही त्यांनी केला. मुंबई क्राइम ब्रांचकडे तपास असून आपला जबाब नोंदवण्यात आला आहे आणि CCTV फुटेज ताब्यात घेण्यात आल्याचे आपल्याला सांगण्यात आल्याचे वाकोडे म्हणाले. क्राइम ब्रांचच्या तपासावर पूर्ण विश्वास असल्याचे सांगतानाच तपास वेगाने करून आरोपींना अटक करण्याची मागणी त्यांनी केली. अटक न झाल्यास उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला.