मॉडेल दिव्या पाहुजाच्या हत्येसाठी वापरण्यात आलेली कार पोलिसांनी जप्त केली आहे. याशिवाय दिव्याच्या हत्येमागील आरोपींनाही पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
Divya Pahuja Murder : गुरुग्राम (Gurugram) येथे 27 वर्षीय मॉडेल असलेल्या दिव्या पाहुजाची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. दिव्या पाहुजाच्या हत्येसाठी वापरण्यात आलेली कार गुरुग्राम पोलिसांनी पंजाब मधील पटियाला (Patiala) येथून ताब्यात घेतली आहे. पण पोलिसांना मॉडेलचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही.
खरंतर दिव्या पाहुजाची हत्या गुरूग्राम येथील एका हॉटेलमध्ये करण्यात आली होती. हत्येनंतर सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता, त्यामध्ये दिव्याचा मृतदेह खोलीतून घेऊन जाताना स्पष्टपणे दिसून आले आहे. या प्रकरणातील तीन आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
कुठे आहे दिव्याचा मृतदेह?
गुरुग्राम पोलिसांनी दिव्याच्या हत्येसाठी वापरण्यात आलेली कार जप्त केली असून तीन आरोपींनाही ताब्यात घेतले आहे. पण अद्याप मॉडेलचा मृतदेह पोलिसांना मिळालेला नाही. पोलिसांकडून सातत्याने आरोपींची चौकशी करत आहेत. असा दावा केला जातोय की, लवकरच मॉडेलच्या मृतदेहाचा शोध लावला जाईल.
आतापर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार, पाचजण मॉडेलला घेऊन एका हॉटेलच्या खोलीत गेले. येथेच दिव्यावर गोळीबार करत तिची हत्या केली. दावा असा देखील केला जातोय की, मॉडेल कथित रूपात हॉटेलच्या मालकाला अश्लील फोटोंमुळे ब्लॅकमेल करत होती.
सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले सत्य
हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता त्यामध्ये दिसले की, रात्री 10 वाजून 45 मिनिटांनी दिव्याचा मृतदेह दोन व्यक्ती खोलीतून खेचत घेऊन जात आहेत. पोलिसांनी म्हटले की, दिव्याचा मृतदेह हॉटेल मालकाच्या निळ्या रंगातील बीएमडब्लू कारमधून नेण्यात आला.
या प्रकरणातील मुख्य आरोपी अभिजित सिंह याने हॉटेलपासून एक किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या बलराज गिल उर्फ हेमराज (28) याच्याकडे दिव्याच्या मृतदेहासह कारही दिली. गुडगाव पोलिसांना गुरुवारी संध्याकाळी (4 जानेवारी) बीएमडब्लू कार पंजाब मधील पटियाला येथील एका बस स्टॅण्डजवळ आढळली. पण माजी मॉडेल असलेल्या दिव्याचा मृतदेह त्या कारमध्ये नव्हता. अशातच आता पोलिसांकडून मॉडेलच्या मृतदेहाचा वेगाने शोध घेतला जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
आणखी वाचा :
Mumbai : 19 वर्षीय विद्यार्थिनीची इमारतीच्या 14व्या मजल्यावरून खाली उडी मारत आत्महत्या
अल्पवयीन मुलीवर 13 जणांनी केला सामूहिक बलात्कार, हत्येचाही केला प्रयत्न
अभिनेते राकेश बेदी यांची ऑनलाइन फसवणूक, सैन्यातील अधिकारी असल्याचे सांगत घातला 85 हजारांचा गंडा