Delhi Viral Video: दिल्लीत थरार! कारने बाईकला फरफटत नेलं, ७३ वर्षीय ड्रायव्हरला अटक

vivek panmand   | CMS
Published : Sep 20, 2026, 07:48 PM IST
Delhi Viral Video: दिल्लीत थरार! कारने बाईकला फरफटत नेलं, ७३ वर्षीय ड्रायव्हरला अटक

सार

दिल्लीतील आरके पुरममध्ये एका कारने बाईकला धडक देऊन अनेक मीटरपर्यंत फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुदैवाने यात बाईकस्वार बचावला. याप्रकरणी पोलिसांनी ७३ वर्षीय कार चालकाला अटक केली असून घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

दिल्लीतील आरके पुरम भागात एका कारने बाईकला धडक देऊन रस्त्यावरून अनेक मीटरपर्यंत फरफटत नेल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी ७३ वर्षीय कार चालकाला अटक केली आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १७ सप्टेंबर रोजी गुरुवारी रात्री १०.२२ च्या सुमारास घडली.

कारने बाईकला फरफटत नेलं

पोलिसांनी वसंत कुंज येथे राहणाऱ्या वेणू गोपाल या ७३ वर्षीय वृद्धाला अटक केली आहे. ते त्यांची निळ्या रंगाची होंडा अमेज कार चालवत होते. त्यावेळी त्यांनी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तनिश टोकस याच्या बाईकला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे तनिश बाईकवरून खाली पडला, पण सुदैवाने त्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.

धडक दिल्यानंतरही कार थांबली नाही. बाईक कारच्या खाली अडकली आणि तशाच अवस्थेत कारने बाईकला काही मीटरपर्यंत फरफटत नेलं. त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी मध्यस्थी करत कार थांबवली. याच दरम्यान कोणीतरी या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की बाईक कारखाली अडकली आहे आणि तिला रस्त्यावरून फरफटत नेलं जात आहे.

चालकाला अटक

या घटनेनंतर पोलिसांनी वेणू गोपाल यांना अटक केली आणि त्यांची होंडा अमेज कार जप्त केली. भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांखाली पोलिसांनी त्यांच्यावर एफआयआर दाखल केला आहे. अपघातानंतर पोलिसांनी चालकाची वैद्यकीय तपासणी केली, मात्र त्यात त्यांनी मद्यपान केल्याचं निष्पन्न झालं नाही. त्यांनी इतर कोणतंही अमली पदार्थ सेवन केलं होतं का, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलीस सध्या या अपघाताच्या कारणांचा सविस्तर तपास करत आहेत.

PREV
Crime News (गुन्हे बातम्या): Read Crime News LIVE Updates, Check पुणे क्राईम न्यूज, ठाणे क्राईम न्यूज, मुंबई क्राईम न्यूज & other trending news in Marathi at Asianet Marathi News .
Read more Articles on

Recommended Stories

Tiger Shroff case | टायगर प्रकरणी ३ ताब्यात; DCP राज तिलक रोशन
Tiger Shroff case | टायगर श्रॉफ प्रकरणी ३ ताब्यात; कोटा SP तेजस्विनी गौतम