
हैदराबाद: हैदराबादमध्ये रस्ता ओलांडताना एका ३ वर्षांच्या चिमुकल्याला कारने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात या लहानग्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मन्सुराबादच्या व्यंकटेश्वर कॉलनीत १३ सप्टेंबर रोजी ही हृदयद्रावक घटना घडली. बी. लकी असे या मृत मुलाचे नाव आहे. या अपघाताचे अंगावर काटा आणणारे सीसीटीव्ही फुटेज परिसरातील कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
लहानगा लकी कोणाच्याही नकळत एकटाच रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होता. त्याचवेळी भरधाव वेगात आलेल्या एका कारने त्याला उडवले. मुलगा अचानक रस्त्यावर आल्याने चालकाला तो दिसला नसावा, असा प्राथमिक अंदाज आहे. धडकेनंतर गंभीर जखमी झालेल्या लकीला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, पण दुर्दैवाने त्याचे प्राण वाचू शकले नाहीत. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची दखल घेत एल.बी. नगर पोलिसांनी कार चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवणे आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
A three-year-old boy, Izhan Uddin, died after being allegedly hit by a vehicle at I.S. Sadan X Road, Hyderabad. The driver reportedly fled the scene. #Hyderabad #ISSadan #RoadAccident #Telangana @VoiceUpMedia1 pic.twitter.com/7iWbFqzjFU
— Voiceup Media (@VoiceUpMedia1) September 20, 2026