"तू माझ्यासोबत चल!" – विश्रांतवाडीत विवाहितेचा छळ; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

Published : May 03, 2025, 01:45 PM IST
Rape

सार

विश्रांतवाडीत एका विवाहित महिलेचा तीन तरुणांनी भर रस्त्यात छळ केला. 'बॉस' असल्याचा दावा करणाऱ्या तरुणाने अश्लील शब्दांत छेड काढली. महिलेने धैर्य दाखवत पोलिसांत तक्रार दाखल केली असून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

“तू माझ्यासोबत चल, मी इथला बॉस आहे!” असं म्हणत तीन तरुणांनी एका विवाहित महिलेचा भर रस्त्यात छळ केल्याची संतापजनक घटना विश्रांतवाडीत घडली आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ही घटना कलासजवळ घडली. संबंधित महिला विश्रांतवाडी चौकातून आपल्या कामानिमित्त चालत होती. त्याच वेळी दुचाकीवरून आलेल्या तिघांनी तिचा पाठलाग करत अश्लील आणि आक्षेपार्ह शब्दांत छेड काढण्यास सुरुवात केली.

संकेत सावंत (राहणार – कळस माळवाडी) या आरोपीने स्वतःला 'बॉस' म्हणवत, तिच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्याच्या जोडीला असलेल्या अन्य दोन अनोळखी तरुणांनीही अत्यंत अश्लील टिप्पणी करत महिलेला धमकावले. “तू खूप चांगली दिसतेस, आम्ही तुझा रात्रीचा खर्च देऊ,” अशी बिनधास्त भाषा वापरत त्यांनी तिच्या प्रतिष्ठेवर घाला घालण्याचा प्रयत्न केला.

सुदैवाने धैर्य दाखवत महिलेने थेट विश्रांतवाडी पोलिस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. तिच्या जबाबावरून संकेत सावंतसह अन्य दोन अज्ञात आरोपींविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून इतर दोन आरोपींचा शोध घेतला जात आहे. विश्रांतवाडी परिसरात अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत असून, स्थानिक 'दादा'गिरीचा मुखवटा घालून महिलांना छळले जाण्याचे प्रकार चिंतेची बाब ठरत आहेत. नागरिकांनी पोलिसांकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे. 

PREV

Recommended Stories

गुजरात हादरलं! साडीवरून झालेल्या वादातून लग्नाच्या दिवशीच होणाऱ्या पतीने केला वधूचा खून
Sangali Crime : सांगली हादरली! राजकीय पदाधिकाऱ्याचा वाढदिवसाच्या कार्यक्रमात खून