
केतन अग्रवाल यांचे वडील विशाल अग्रवाल यांनी मुलाच्या प्रकरणात लवकरात लवकर न्याय मिळावा, अशी मागणी केली. तपासावर विश्वास असल्याचे सांगत त्यांनी खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. मुलाच्या निधनानंतर वडिलांचाही मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुहेरी दुःख कोसळल्याचे त्यांनी सांगितले. नरेंद्र मित्तल यांच्याबाबत संशय व्यक्त करताना तपास यंत्रणांवर पूर्ण विश्वास असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. समाजाने न्यायासाठी अशीच साथ कायम ठेवावी, असे आवाहनही त्यांनी केले.