सूचना सेठीला लग्नाच्या 9 वर्षानंतर झाला होता मुलगा, शुल्लक कारणाने घेतला चिमुकल्याचा जीव

Published : Jan 09, 2024, 06:40 PM ISTUpdated : Jan 09, 2024, 07:21 PM IST

बंगळुरूमधील स्टार्टअप कंपनी Mindful AI Labची संस्थापक आणि सीईओ असलेल्या सूचना सेठने गोव्यात आपल्याच मुलाची हत्या केल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सूचनाला अटक केली आहे.

PREV
17
निष्पाप मुलाचा आईनेच घेतला जीव

बंगळुरूतील एका स्टार्ट कंपनी Mindful AI Labची संस्थापक सूचना सेठीने आपल्याच मुलाची हत्या केली. गोव्यातील एका हॉटेलमध्ये करण्यात आलेल्या मुलाच्या हत्येने देशभरात खळबळ उडाली आहे.

27
बंगालमध्ये राहणारी सूचना

39 वर्षीय आरोपी महिला मूळची पश्चिम बंगालमधील स्थानिक रहिवाशी आहे. सध्या सूचना बंगळुरूत राहत होती. सूचनाचा पतीशी घटस्टफोट झाला होता आणि ती आपल्या चार वर्षाच्या मुलासोबत राहात होती.

37
इंडोनेशियात असतो पती

सूचना सेठचा पती वेंकट रमन केरळातील राहणारा आहे. पण सध्या रमन इंडोनेशियात राहातो. पोलिसांनी रमनला भारतात चौकशीसाठी बोलावले आहे.

47
लग्नाच्या 9 वर्षानंतर मुलाला दिला होता जन्म

आरोपी महिला सूचना सेठने वर्ष 2010 मध्ये वेंकट रमन याच्यासोबत लग्न केले होते. पण लग्नाच्या 9 वर्षानंतर वर्ष 2019 मध्ये सूचनाने जन्म दिला होता.

57
मुलाच्या जन्मानंतर पती-पत्नीमध्ये वाद

मुलाच्या जन्माच्या एका वर्षानंतरच वर्ष 2020 मध्ये सूचना आणि रमन यांच्यामध्ये वाद सुरू झाला होता. यानंतर दोघांचा घटस्फोट झाला होता. मुलगा सूचनासोबत राहिल असा आदेश कोर्टाने दिला होता.

67
कोर्टाचा आदेश सूचनाने मोडला

मुलाने वडिलांना भेटू नये असे सूचनाला वाटत होते. पण कोर्टाने आठवड्यातून एकदा मुलाला भेटण्याची परवानगी वडिलांना दिली होती.

77
चार वर्षाच्या चिमुकल्याची हत्या

Recommended Stories