Beed Crime : बीडमध्ये तरुणाचे अपहरण करत दारू पाजली अन् मारहाण, घटनेने जिल्ह्यात खळबळ

Published : May 21, 2025, 12:32 PM IST
crime news

सार

Beed Crime : बीडमध्ये एका तरुणाचे अपहरण करत त्याला दारु पाजली. यानंतर मारहाण करत अत्याचारही केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

Beed Crime : बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा गुन्हेगारीचा थरकाप उडवणारा प्रकार उघडकीस आला आहे. माजलगाव तालुक्यातील जीवनापूर येथील अप्पा काशिनाथ राठोड यांचे अज्ञात गुन्हेगारांनी अपहरण करून सात तास अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. १८ मे रोजी सायंकाळी ६ वाजता घडलेली ही घटना आता जिल्हाभर चर्चेचा विषय बनली आहे.

चहाच्या बहाण्याने नेऊन अमानुष मारहाण
 प्राथमिक माहितीनुसार, आरोपींनी चहा पिण्याच्या बहाण्याने अप्पा राठोड यांना दुचाकीवरून निर्जनस्थळी नेले. तेथे ५ ते ६ जणांनी त्यांना दारू पाजली, आणि नंतर जबरदस्तीने वाहनात टाकून अपहरण केले. या दरम्यान त्यांना सात तास अत्यंत क्रूरपणे मारहाण करण्यात आली. त्यांच्या डोक्याला सात टाके पडले असून, संपूर्ण शरीरावर जखमा आणि फटक्यांचे व्रण आहेत. त्यांच्यावर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मारहाणीचा व्हिडीओ करून धमकी 
या क्रूर प्रकारात गुन्हेगारांनी मारहाण करतानाचा व्हिडीओ तयार केला असून, तो व्हायरल करण्याची धमकी राठोड यांना देण्यात आली. ही बाब आप्पा राठोड यांनी स्वतः स्पष्ट केली आहे. बीडमध्ये अलीकडेच घडलेल्या शिवराज दिवटे मारहाण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, ही दुसरी गंभीर घटना असल्याने जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.

पोलिसांचा उदासीन प्रतिसाद 
आप्पा राठोड यांनी सांगितले की, अपहरण आणि मारहाण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी पोलीस ठाण्यात निवेदन दिले, मात्र कोणताही पोलीस जबाब घेण्यासाठी आलेला नाही. “माझी सुट्टी संपताच मी स्वतःच तक्रार देणार आहे,” असे त्यांनी नमूद केले.

अद्याप गुन्हा नोंदवला नाही 
सर्वात चिंताजनक बाब म्हणजे, इतक्या गंभीर घटनेनंतरही अद्याप कोणताही गुन्हा नोंदवला गेलेला नाही, आणि पोलीस यंत्रणा दिरंगाईच्या आरोपांखाली आहे. या अमानुष गुन्ह्याच्या आरोपींवर तात्काळ कारवाई करून, पीडिताला न्याय मिळवून द्यावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

गुजरात हादरलं! साडीवरून झालेल्या वादातून लग्नाच्या दिवशीच होणाऱ्या पतीने केला वधूचा खून
Sangali Crime : सांगली हादरली! राजकीय पदाधिकाऱ्याचा वाढदिवसाच्या कार्यक्रमात खून