भरधाव कारने दहा जणांना उडवलं, फुटपाथवर चढून दुकानांचा केला चक्काचूर

Published : Jul 07, 2026, 04:24 PM IST
vehicle accident

सार

नवी मुंबईतील तळोजा येथे एका भरधाव कारचालकाने नियंत्रण सुटल्याने दहा जणांना उडवले. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून आठ जण जखमी आहेत. चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

मुंबई: सध्याच्या काळात अपघात मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहेत. नवी मुंबईतील तळोजा भागात भीषण अपघाताची घटना घडली आहे. येथे स्पीडमध्ये येणाऱ्या कारचालकाने दहा जणांना कारने उडवलं. त्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. ड्रॉयव्हरच गाडीवरच नियंत्रण सुटून हा अपघात झाला. या अपघातात आठ जण जखमी असून गाडीचा चालक घटनास्थळावरून पळून गेला. अपघातामुळं जागेवरच दोघांचा मृत्यू झाला.

जखमींना तातडीने रुग्णालयात केलं दाखल 

अपघातात जखमी झालेल्या लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. कारचा स्पीड एवढा भयानक होता की ती रस्त्यावरून फुटपाथवर जाऊन तीन तिथल्या दुकानांना उडवलं. या फुटपाथवर टपऱ्या होत्या, त्या टपऱ्यांना या गाडीने उडवलं. तो गाडी चालवणारा ड्रायव्हरनं ड्रिंक करून गाडी चालवली होती का हा प्रश्न विचारला जात आहे. पोलीस याबाबतची अधिक चौकशी करत आहे.

दोन जणांचा झाला मृत्यू 

या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. या कारमध्ये एकटा कारचालक होता, त्याच्यासोबत कोणी नव्हतं असं सांगितलं जात आहे. याबाबतचा अधिक तपास पोलिसांच्या वतीने केला जात आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

त्या चौथी पास जरांगेला तर गोळी मारायला लागतेय, रेकॉर्डिंगनंतर जरांगे पाटलांच्या जीवाला धोका
सियाची पैशाची मस्ती एकदिवस नक्की उतरेल, आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केला दावा