बीडमध्ये उपसरपंचाला केली बेदम मारहाण, व्हिडीओ झाला व्हायरल

Published : Jul 13, 2025, 03:00 PM IST
beed crime

सार

बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात निपाणी टाकळी येथे महिला सरपंचाच्या पतीने उपसरपंचाला बेदम मारहाण केली. उपसरपंच लक्ष्मण चव्हाण यांनी बोगस कामाबद्दल प्रश्न विचारल्याने हा वाद झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बीड जिल्ह्यात माजलगाव तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. येथील निपाणी टाकळी गावातील महिला सरपंचाच्या पतीने उपसरपंचाला मारहाण केली आहे. लक्ष्मण चव्हाण असं उपसरपंचाचे नाव असून त्यानं बोगस काम काढू नका असं सांगितलं होतं. यावरून वाद झाला असून उपसरपंचाला बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बीडमध्ये कायदा व सुव्यस्थेचा मोठा प्रश्न 

बीड जिल्हा मागील काही दिवसांपासून चर्चेत आला आहे. आधी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि इतर प्रकरणांमुळे तो कायमच चर्चेत राहत आला आहे. माजलगाव गावातील एक मारहाणीची घटना समोर आली आहे. येथे झालेली मारहाण काळीज पिळवटून टाकणारी आहे. तालुक्यातील निपाणी टाकळी येथे ग्रामसभा होती.

उपसरपंचाला केली बेदम मारहाण 

उपसरपंच लक्ष्मण चव्हाण यांनी ग्रामसभेमध्ये काही प्रश्न विचारले होते, त्यावेळी त्यांनी बनावट काम करून बिल काढू नका असं म्हटलं होतं. याचा राग सरपंच महिलेचा पती भगवान राठोड याला आला. त्यानंतर लक्ष्मण चव्हाण यांना भगवान राठोड आणि त्याचे साथीदार जयकोबा राठोड या दोघांनी मिळून घेरलं. 'तू ग्रामसभेत बोगस कामाबद्दल कसा बोललास?' असा जाब विचारला. त्यानंतर त्यांनी लाठ्या-काठ्या आणि दगडांनी मारहाण करायला सुरुवात केली. 'याचे पाय तोडा', असेही ते ओरडत होते. ही घटना माजलगाव-परभणी रस्त्यावर शनिवारी सायंकाळी 5 ते 6 च्या दरम्यान घडली.

या मारहाणीत चव्हाण हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यानंतर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण सुरु आहे. या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोक टीका करत आहेत.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

गुजरात हादरलं! साडीवरून झालेल्या वादातून लग्नाच्या दिवशीच होणाऱ्या पतीने केला वधूचा खून
Sangali Crime : सांगली हादरली! राजकीय पदाधिकाऱ्याचा वाढदिवसाच्या कार्यक्रमात खून