
अल्पवयीन मुलांसोबत शारीरिक संबंध ठेवल्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. मुंबईतील दादरमधील एका हायप्रोफाईल शाळेतील शिक्षिका आणि अल्पवयीन विद्यार्थी यांच्यातील प्रकरण उघडकीस आलं होतं. या प्रकरणात शिक्षिकेला अटक करण्यात आलं असून त्यामधून एक ट्विस्ट समोर आलं आहे. जामीन मिळवण्यासाठी केलेल्या अर्जात विद्यार्थीच शिक्षिकेच्या प्रेमात होता असं समजलं आहे.
अटकेत असलेल्या शिक्षिकेने जामीन अर्जाच्या वेळी पुरावे सादर केले आहेत. त्यामध्ये मुलाने पाठवलेले प्रेमपत्र आणि चॅटिंगचे कोर्टात पुरावे म्हणून सादर केले. त्यामुळे या प्रकरणाला एक नवीनच वळण मिळणार असल्याचं दिसून येत आहे. शिक्षिकेने अर्जात विद्यार्थी आणि तिच्यात झालेल्या चॅट्स सादर केल्यात. त्या चॅट्समध्ये तो त्या शिक्षिकेला किकी आणि पुकी नावाने बोलवत असल्याचं दिसून आलं आहे.
विद्यार्थी त्याच शिक्षिकेला पत्नी म्हणून बोलवत होता. शिक्षिका सध्या अटकेत असून तिने दाखल केलेल्या पुराव्यांवरून विद्यार्थी आणि तिच्यात संभाषण होत असल्याचं दिसून आलं. शिक्षिका विद्यार्थ्याला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नेत असायची आणि तिथं गेल्यानंतर त्याच्यावर अत्याचार करायची, असा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे.
शिक्षिकेवर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आता तिने कोर्टात दाखल केलेल्या पुराव्यांवरून प्रकरणाला नवीन ट्विस्ट मिळाला आहे. शिक्षिका ही ४० वर्षांची असून ती विवाहित असल्याची माहिती समजली आहे. तिला एक मूल असून पीडित मुलगा हा ११ वी मध्ये शिकत होता. तक्रारीत म्हटले आहे की, डिसेंबर २०२३ मध्ये शिक्षिका विद्यार्थ्यांच्या संपर्कात आली.
त्यानंतर त्या दोघांमधील संबंध वाढत गेले. शिक्षिकेनं विद्यार्थ्याशी निर्जन जागी जाऊन संबंध ठेवले होते. विद्यार्थी आणि शिक्षिका या दोघांमध्ये फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाऊन शारीरिक संबंध तयार झाले होते. मात्र आता या प्रकरणाला नवीन ट्विस्ट मिळाला आहे.