Crime : मुंबईत शॉपिंग सेंटरच्या टॉयलेटमध्ये महिलेची छेडछाड, जीवे मारण्याचाही प्रयत्न; आरोपीला अटक

Crime News : दक्षिण मुंबईतील एका शॉपिंग सेंटरच्या टॉयलेटमध्ये महिलेची छेडछाड करण्यात आली. यानंतर महिलेला जीवे मारण्याचाही प्रयत्न करण्यात आला.

Mumbai Crime News : दक्षिण मुंबईतील एका शॉपिंग सेंटरच्या टॉयलेटमध्ये 35 वर्षीय महिला वकील सोबत कथित रुपात छेडछाड करण्यात आली. याशिवाय महिलेला जीवे मारण्याचाही प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. सदर घटनेची माहिती पोलिसांनी दिली आहे.

नक्की काय घडले?
घटना गुरुवारी (18 एप्रिल) सकाळी आठ वाजता लोकमान्य टिळक मार्गावरील अशोक शॉपिंग सेंटरमधील (Ashok Shopping Center) आहे. येथेच पीडित महिलेचे कार्यालयही आहे. पीडित महिला शॉपिंग सेंटरच्या शॉयलेटमध्ये गेली असता तिने तेथे एका 21 वर्षीय व्यक्तीला पाहिले. महिलेने व्यक्तीला टॉयलेटमधून जाण्यास सांगितले. आरोपीने असा दिखावा केला की, तो टॉयलेटच्या बाहेर जातोय. महिला टॉयलेटमधून बाहेर आली असता, आरोपी तेथेच उभा असल्याने तिने पाहिले. आरोपीने टॉयलेटचा मुख्य दरवाजा आतमधून बंद केला होता.

यानंतर आरोपीने महिलेची छेडछाड केली. याशिवाय आवाज केल्यास महिलेला जीवे मारण्याची धमकीही दिली. पण त्यावेळी महिलेने आरोपीच्या तावडीतून आपला बचाव केला. या घटनेची माहिती पोलिसांना दिली असता आरोपीला अटक करण्यात आली आहे. रमाशंकर गौतम उर्फ संदीप पांडे असे आरोपीचे नाव आहे.

आरोपीची तुरुंगात रवानगी
या घटनेतील आरोपी जवळच्याच एका कार्यालयात गार्डचे काम करतो. महिलेली छेडछाड आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणात आरोपीला येत्या 23 एप्रिलपर्यंत तुरुंगाची शिक्षा सुनावली आहे.

मिरा-भायंदरमध्ये चार वर्षीय चिमुरडीवर बलात्कार 
गेल्या काही दिवसांपूर्वी मिरा भायदंरमध्ये एका चार वर्षीय चिमुरडीवर 45 वर्षीय व्यक्तीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. घटना मिरा रोड येथील रामदेव पार्क येथील होते. या प्रकरणातील आरोपीचे नाव मोहम्मद दराज असून त्याला स्थानिकांनी पकडत पोलिसांच्या ताब्यात दिले होते. याशिवाय घटनेबद्दल कळताच स्थानिकांनी आंदोलन करत आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशीही मागणी केली होती. 

आणखी वाचा : 

Neha Hiremath Murder Case : भाजपचा लव्ह जिहादचा आरोप,तर काँग्रेसचं म्हणणं प्रेम संबंधातून...नेमकी प्रकरण काय जाणून घ्या

Pune Crime News : पुण्यात बंदूकबाजांची झाडाझडती, तरीही सलग चौथ्या दिवशीही गोळीबार कसं काय ?

Share this article