Budget 2025 : भारतातील या 3 पंतप्रधानांनी सादर केला होता अर्थसंकल्प

Published : Jan 30, 2025, 02:50 PM IST
Budget

सार

भारताच्या आर्थिक इतिहासामध्ये केंद्रीय अर्थसंकल्पाचे खास महत्व आहे. देशाचा अर्थसंकल्प मांडताना सर्वांचे लक्ष त्याकडे लागून असते. पण देशात असे काही पंतप्रधान होते ज्यांनी अर्थमंत्रीच्या रुपात यशस्वी कार्य करुन अर्थसंकल्पही सादर केला होता.

Union Budget 2025 : भारताच्या आर्थिक इतिहासामध्ये केंद्रीय अर्थसंकल्पाला फार मोठे स्थान आहे. अर्थसंकल्पात सरकार केवळ उत्पन्न आणि खर्चाबद्दलच नव्हे तर देशाच्या विकासासंदर्भातील रोडमॅप सादर करतात. सर्वसामान्यपणे अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांकडून सादर केला जातो. पण इतिहासात अशी काही वेळ आली होती ज्यामध्ये पतंप्रधानांनी अर्थमंत्र्यांची जबाबदारी घेतली होती.यामध्ये इंदिरा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि राजीव गांधी अशा पंतप्रधानांनी अर्थमंत्रालयाचा अतिरिक्त प्रभार सांभाळत अर्थसंकल्प सादर केला होता.

पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू

जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान होते ज्यांनी अर्थसंकल्प सादर केला होता. वर्ष 1958-59 च्या काळात ज्यावेळी तत्त्कालीन अर्थमंत्री टी.टी. कृष्णमाचारी यांनी मुद्रा घोटाळ्यामुळे राजीनामा दिला होता. यावेळी नेहरू यांनी अर्थमंत्रालयाचा अतिरिक्त प्रभार सांभाळत अर्थसंकल्प सादर केला होता.

पहिली महिला अर्थमंत्री आणि अर्थसंकल्प सादर करणारी महिला

वर्ष 1969 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री मोरारजी देसाई यांच्या राजीनाम्यानंतर इंदिरा गांधी यांनी अर्थमंत्रालयाचा कार्यभार सांभाळला. त्यांनी वर्ष 1970 मध्ये अर्थसंकल्प सादर केला आणि देशातील पहिल्या पहिल्या अर्थमंत्री झाल्या. आपल्या भाषणामध्ये इंदिरा गांधी यांनी सिगरेटवर टॅक्स वाढण्याबद्दल भाष्य करत सिगरेट ओढणाऱ्यांची माफीही मागितली होती. एक वर्ष अर्थमंत्रालय सांभाळल्यानंतर हा प्रभार यशवंतराव चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात आला होता.

राजीव गांधींकडे पंतप्रधानांसह अर्थमंत्र्यांची जबाबदारी

वर्ष 1987 मध्ये राजीव गांधी यांनी अर्थमंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळला. वी. पी. सिंह यांना अर्थमंत्री पदावरुन हटवल्यानंतर राजीव गांधी यांनी स्वत: ती जबाबदारी घेतली होती. त्यावेळी अर्थसंकल्प सादर करताना आर्थिक सुधारणा आणि जनतेच्या अपेक्षांमध्ये संतुलन होते.

आणखी वाचा : 

Budget 2025 मध्ये कोणत्या गोष्टी महाग आणि कोणत्या स्वस्त होऊ शकतात? घ्या जाणून

Budget 2025 : शेअर मार्केट 1 फेब्रुवारीला सुरू असणार की बंद ? वाचा डिटेल्स

PREV

Recommended Stories

Gold Rate: 11 महिन्यांत सोनं किती महागलं, खरेदीआधी जाणून घ्या आजचा भाव
अनिल अंबानी यांनी Cobrapost आणि Economic Times विरोधात 41 हजार कोटींच्या फसवणूक प्रकरणावरून बदनामीचा दावा दाखल