Budget 2025 : शेअर मार्केट 1 फेब्रुवारीला सुरू असणार की बंद ? वाचा डिटेल्स

Published : Jan 29, 2025, 05:16 PM IST
Share Market

सार

भारतीय शेअर मार्केट सर्वसामान्यपणे शनिवार आणि रविवारी बंद असते. यंदा शनिवारी म्हणजेच 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेत अर्थसंकल्प 2025 सादर करणार आहेत. यामुळे भारतीय शेअर मार्केट अर्थसंकल्पावेळी खुले राहणार आहे.

Share Market Open on 1st Feb Budget 2025 Day :  भारतीय शेअर मार्केट सर्वसामान्यपणे शनिवार आणि रविवारी बंद असते.पण यंदा शनिवारी, 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेत अर्थसंकल्प 2025 सादर करणार आहेत. यामुळेच भारतीय शेअर मार्केट शनिवारी सुरू राहणार आहे. नॅशनल स्टॉक एक्सजेंच (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्सजेंच (BSE) कडून घोषणा करण्यात आली आहे की, अर्थसंकल्प 2025 लक्षात घेता शनिवारी संपूर्ण दिवस शेअर मार्केट खुले राहणार आहे. सोमवारी जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, एनएसई आणि बीएसईने स्पष्ट केले आहे की, 1 फेब्रुवारीला लाइव्ह ट्रेडिंग होणार आहे. याशिवाय 1 फेब्रुवारीला सादर होणारा अर्थसंकल्प 2025 चा दिवस स्पेशल ड्रेटिंग डे म्हणून साजरा केला जाणार आहे. याआधी देखील 1 फेब्रुवारी 2020 आणि 28 फेब्रुवारी 2015 रोजी अर्थसंकल्पामुळे शेअर मार्केट शनिवारी खुला ठेवण्यात आला होता.

ट्रेडिंग सेशनचे शेड्यूल

शनिवारी 1 फेब्रुवारीला अन्य दिवसांप्रमाणे शेअर मार्केट खुले राहणार आहे. इक्विटी मार्केट सकाळी 9.15 वाजल्यापासून ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत तर कमोडिटी डेरिवेटिव्स मार्केटमध्ये ट्रेडिंग संध्याकाळी 5.00 वाजेपर्यंत केली जाऊ शकते. दरम्यान, सेटलमेंट हॉलिडेच्या कारणास्तव "T-O" सेशन बंद राहणार आहे. ट्रेडिंग सेशनसंदर्भातील माहिती खाली पाहा-

  • इक्विटी मार्केट : सकाळी 9.15 वाजल्यापासून ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत
  • कमोडिटी डेरिवेटिव्स मार्केट : संध्याकाळी 5.00 वाजेपर्यंत
  • सेटलमेंट हॉलिडेच्या कारणास्तव T-O सेशन बंद राहिल
  • ब्लॉक डील (सेशन 1) : सकाळी 8.45 ते 9.00 वाजेपर्यंत
  • स्पेशल प्री-ओपन सेशन (IPO आणि री-लिस्टेड स्टॉकसाठी) : सकाळी 9.00 वाजल्यापासून ते 9.45 पर्यंत
  • कॉल ऑक्शन इलिक्विड सेशन : सकाळी 9.30 वाजल्यापासून ते दुपारी 3.30 पर्यंत
  • ब्लॉक डील (सेशन 2) : दुपारी 2.05 वाजल्यापासून ते 2.20 पर्यंत
  • पोस्ट क्लोजिंग सेशन : दुपारी 3.40 वाजल्यापासून ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत
  • ट्रेड मॉडिफिकेशन कट ऑफ टाइम : 4.15 मिनिटांनी

अर्थसंकल्पाचा शेअर मार्केटवर होणारा परिणाम

अर्थसंकल्प भारताच्या अर्थव्यवस्थेची दिशा ठरवणारे एक महत्वाचे कागदपत्र आहे. नवे आर्थिक सुधार, आर्थिक योदना आणि शासकीय खर्चांच्या रुपरेषा अर्थसंकल्पाच्या दिवशी ठरल्या जातात. याचा थेट परिणाम शेअर मार्केटवर होतो. अर्थसंकल्प सादर केल्या जाणाऱ्या घोषणांवेळी शेअर मार्केटमध्ये अस्थिरता पहायला मिळू शकते. याशिवाय गुंतवणूकदार आणि शेअर मार्केटसंबंधित तज्ञांचेही अर्थसंकल्पाकडे पूर्ण लक्ष असते.

आणखी वाचा : 

Budget 2025 मध्ये कोणत्या गोष्टी महाग आणि कोणत्या स्वस्त होऊ शकतात? घ्या जाणून

अर्थसंकल्पापूर्वी Revenue vs Capital Budget बद्दल प्रत्येक गोष्ट जाणून घ्या

PREV

Recommended Stories

Gold Rate: 11 महिन्यांत सोनं किती महागलं, खरेदीआधी जाणून घ्या आजचा भाव
अनिल अंबानी यांनी Cobrapost आणि Economic Times विरोधात 41 हजार कोटींच्या फसवणूक प्रकरणावरून बदनामीचा दावा दाखल