Budget 2025 Memes : आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर केला जात आहे. अशातच सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ‘X’ वर मीम्स येण्यास सुरुवात झाली आहे.
Budget 2025 Memes : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून संसदेत 11 वाजल्यापासून अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात करण्यात आली होती. या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले होते. अशातच अर्थसंकल्पात मोबाइल बॅट्री, कॅन्सरवरील 36 औषधे आणि इलेक्ट्रिकल कार स्वस्त होणार आहे. याशिवाय 12 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आल्याचा मोठा निर्णय अर्थसंकल्पात घेण्यात आली आहे. पण तरीही सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ‘X’ वर मीम्स येण्यास सुरुवात झाली आहे.
दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पूर्ण अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पावर संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले होते. यंदा लोकसभा निवडणुकीनंतर सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प अत्यंत खास असल्याचे मानले जात होते.
आणखी वाचा :
Budget 2025: शेतीपासून रेल्वेपर्यंत, इन्कम टॅक्स ते होम लोन, विकासासाठी घोषणा!