UPI पेमेंट पद्धती सुरु करण्यासाठी NPCI ने आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका खंडातील देशांशी बोलणं सुरु केलं आहे. हा उपक्रम २०२७ च्या सुरुवातीला सुरु करण्याचे त्यांचे ध्येय आहे.
NPCI हे UPI बाबत परदेशी राष्ट्रांशी बोलत असून एका देशाशी बोलणं हे शेवटच्या टप्यात असल्याची माहिती देण्यात आली आहे.
भारताच्या पेमेंट सिस्टमचा प्रचार करण्यावर लक्ष देण्यात येत असून २० देशांशी बोलणं सुरु आहे. पेरू आणि नामिबिया या देशांशी याबाबतचे करार करण्यात आले आहेत.
भारत सरकार जागतिक स्तरावर UPI ला प्रोत्साहन देत आहे. जुलैमध्ये विदेशी पर्यटकांसाठी ‘UPI वन वर्ल्ड’ वॉलेट सादर केले होते.
भारताने जागतिक स्तरावर UPI चा विस्तार करण्यासाठी सुमारे 30 देशांसोबत सामंजस्य करार केले आहेत.