भारतीय सेनेतील मेजर राधिका सेन यांना यूएन मिलिट्री जेंडर ऍडव्हाकेट ऑफ द इयर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे.
मेजर राधिका सेन यांना यूएनकडून पुरस्कार देण्यात आला आहे. त्यांना शांती यूएन शांती अभियानात लैंगिक समानता आणि महिला सक्षमीकरण यासाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मेजर सेन यांना मार्च २०२३ ते एप्रिल २०२४ पर्यंत त्या यूएनच्या मिशनवर तैनात होत्या. त्यांनी तैनात असलेल्या टीमच्या कमांडरची पोस्ट सांभाळली होती.
कांगो देशात कार्यरत असताना महिला आणि बालकांचे प्रश्न सोडवून घेऊन त्याची सोडवणूक करण्यासाठी सेन आणि त्यांच्या टीमने काम केले.
मेजर सेन यांच्या नेतृत्वात महिलांचे आरोग्य, बालकांची काळजी, लैंगिक समानता रोजगार या प्रश्नांवर लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम केले.
मेजर राधिका सेन या हिमाचल प्रदेश मधील मंडी येथील सुंदर नगर येथे राहणाऱ्या आहेत. त्यांचे आई वडील दोघे शिक्षक होते आणि आता ते निवृत्त झाले आहेत.