Utility News

IAS,IPS,IFS अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण कुठे होतात,त्यासाठी किती वेळ लागतो

Image credits: social media

IAS IPS आणि IFS प्रशिक्षण

UPSC CSE द्वारे IAS IPS आणि IFS पदांसाठी निवड झाल्यानंतर, उमेदवाराला या पदाच्या अनुषंगाने जबाबदार अधिकारी बनण्यासाठी कठोर प्रशिक्षण दिले जाते.

Image credits: social media

LBSNAA येथे दिले जाते फाउंडेशन कोर्सचे प्रशिक्षण

IAS, IPS आणि IFS साठी प्रारंभिक फाउंडेशन कोर्सचे प्रशिक्षण उत्तराखंड येथील लाल बहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन (LBSNAA), मसूरी येथे दिले जाते. 

Image credits: social media

3 महिन्यांच्या या कोर्समध्ये प्रशासकीय कौशल्याचे प्रशिक्षण

फाउंडेशन कोर्सचा कालावधी अंदाजे 3 महिने आहे, ज्यामध्ये सर्व IAS, IPS आणि IFS प्रशिक्षणार्थींना भविष्यातील जबाबदाऱ्या हाताळण्यासाठी आवश्यक प्रशासकीय कौशल्ये शिकवली जातात.

Image credits: social media

फाउंडेशन कोर्सनंतर IPS आणि IFS चे प्रशिक्षण

फाउंडेशन कोर्सनंतर, IAS अधिकारी उमेदवार पुढील प्रशिक्षणासाठी LBSNAA येथे राहतात. तर IPS आणि IFS प्रशिक्षणार्थींना मिळालेल्या कॅडरनुसार प्रशिक्षण अकादमींमध्ये पाठवले जाते

Image credits: social media

IAS ऑफिसर्सची ट्रेनिंग कुठे होते ?

IAS अधिकाऱ्यांचे प्रशिक्षणा LBSNAA येथेच होते.फाउंडेशन कोर्सनंतर आयएएसचे प्रोफेशनल ट्रेनिंग सुरू होते. ज्यामध्ये त्यांना प्रशासन आणि प्रशासनाविषयी महत्त्वाची माहिती दिली जाते.

Image credits: social media

संपूर्ण भारताचा प्रवास

या ट्रेनिंगचाच एक भाग म्हणून अधिकाऱ्यांना संपूर्ण देशाचा प्रवास देखील करावा लागतो. यामध्ये त्यांना देशातील विविधतेचे ज्ञान मिळते आणि संस्कृती समजते. 

Image credits: social media

IPS ऑफिसर्सची ट्रेनिंग कुठे होते

या अधिकाऱ्यांची ट्रेनिंग हैद्राबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी मध्ये होते. यामध्ये त्यांना कर्तव्य , साहस आणि इतर कौशल्यांचे मार्गदर्शन केले जाते

Image credits: social media