हिवाळ्यात तेलकट त्वचेला काय करावं, जाणून घ्या पर्याय
Utility News Jan 05 2026
Author: vivek panmand Image Credits:Asianet News
Marathi
चेहरा किती वेळा धुवावा?
ऑईली स्किनसाठी दिवसातून २ वेळाच चेहरा धुवा. सौम्य (Mild) फेसवॉश वापरा जास्त वेळा चेहरा धुतल्यास त्वचा अजून जास्त तेल तयार करू शकते.
Image credits: pinterest
Marathi
मॉइश्चरायझर टाळू नका
हिवाळ्यात ऑईली स्किन असली तरी मॉइश्चरायझर आवश्यक आहे. Oil-free, Gel-based, Non-comedogenic असा मॉइश्चरायझर वापरा, जेणेकरून त्वचा बॅलन्समध्ये राहील.
Image credits: instagram
Marathi
घरगुती उपाय
मुलतानी माती + गुलाबपाणी हे आठवड्यातून १–२ वेळा चेहऱ्याला लावून घ्या. ते अतिरिक्त तेल शोषून घेते. अॅलोवेरा जेल हे रोज रात्री लावा. त्यामुळं त्वचा शांत आणि मॅट ठेवते.
Image credits: Social Media
Marathi
सनस्क्रीन विसरू नका
हिवाळ्यात सूर्यप्रकाश कमी वाटतो, पण UV किरण तितकेच हानिकारक असतात. Gel-based सनस्क्रीन वापरा. ऑईली स्किनसाठी खास असलेलं निवडा.
Image credits: Getty
Marathi
आहाराचा परिणाम त्वचेवर
जास्त तेलकट त्वचेसाठी टाळा. जंक फूड आणि फार तिखट व तेलकट पदार्थ टाळायला हवेत. फळं, हिरव्या भाज्या आणि भरपूर पाणी प्या. आहार सुधारला की त्वचाही सुधारते.