चांदीचा दागिना घातल्यावर काय होतो फायदा, जाणून घ्या माहिती
Utility News Jan 04 2026
Author: vivek panmand Image Credits:gemini
Marathi
चांदी हा फक्त दागिना नसतो
चांदी ही केवळ सौंदर्यासाठी वापरली जाणारी धातू नाही, तर आरोग्य, ऊर्जा आणि परंपरेशी जोडलेली आहे. आपल्या संस्कृतीत चांदीला विशेष महत्त्व आहे.
Image credits: Gemini AI
Marathi
मन शांत ठेवायला मदत
चांदीमध्ये नैसर्गिक थंडावा असतो. चांदीचे दागिने घातल्याने तणाव कमी होतो. मन शांत राहायला मदत होते, म्हणूनच अनेक जण चांदीची अंगठी किंवा साखळी वापरतात.
Image credits: gemini
Marathi
शरीरातील ऊर्जा संतुलित ठेवते
चांदी शरीरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि सकारात्मक ऊर्जा वाढवते, असं मानलं जातं. त्यामुळे थकवा कमी जाणवतो, शरीर अधिक उत्साही वाटतं
Image credits: Gemini AI
Marathi
चांदीचे पैंजण (पायल) का घालतात?
स्त्रिया चांदीचे पैंजण घालतात कारण, रक्ताभिसरण सुधारते, पायांतील उष्णता कमी होते, सांधेदुखीचा त्रास कमी होऊ शकतो.
Image credits: Gemini AI
Marathi
त्वचेसाठी फायदेशीर
चांदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळे त्वचेवर अॅलर्जीचा धोका कमी होतो. संसर्ग टाळण्यास मदत होते, विशेषतः लहान मुलांसाठी चांदी सुरक्षित मानली जाते.
Image credits: instagram
Marathi
धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व
चांदीला पवित्र धातू मानले जाते. देवपूजेत चांदीचा वापर केला जातो, चांदीचे ताईत, अंगठी वापरण्याची प्रथा आहे. वाईट नजरेपासून संरक्षण मिळतं, असं मानलं जातं.