UPI सर्व्हर तात्पुरते डाऊन झाले असते. ५-१० मिनिटांनी पुन्हा ट्राय केल्यास पेमेंट जाऊ शकते.
PhonePe, Google Pay, Paytm, BHIM अशा इतर UPI अॅप्सचा वापर करून ट्रांजॅक्शन ट्राय करा.
तुमच्या मोबाईलचं इंटरनेट नीट चालतंय का ते तपासा. वायफाय बंद करून डेटा ऑन करा किंवा उलट.
बऱ्याच बँक अॅप्समध्ये थेट UPI पेमेंटचं ऑप्शन असतं. अॅप अपडेटेड आहे का तेही पहा.
कधी कधी QR कोड स्कॅनिंगमध्ये प्रॉब्लेम येतो. त्याऐवजी मोबाईल नंबर वापरून पैसे ट्रान्सफर करा.
UPI ट्रान्सॅक्शनचा रिफरन्स नंबर सुरक्षित ठेवा. 1 ते 3 कामकाजाच्या दिवसांत पैसे परत येतात. बँकेच्या कस्टमर केअरशी संपर्क साधा.