सरकारने पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ केली. त्यामुळे सर्वसामान्यांना काहीही फरक पडणार नाही, असे अर्ध्या तासानंतरच स्पष्ट करण्यात आले.
सरकार पेट्रोलवर 19.90 रुपये, डिझेलवर 15.80 रुपये प्रतिलिटर उत्पादन शुल्क आकारते. नव्या आदेशानंतर पेट्रोलवर 21.90 रुपये प्रतिलिटर तर डिझेलवर 17.80 रुपये प्रतिलिटर उत्पादन शुल्क असेल
पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्काचे नवे दर मध्यरात्री 12 पासून लागू होणारय. मात्र, त्याचा सर्वसामान्यांवर परिणाम होणार नसल्याचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने स्पष्ट केले.
गेल्या आठवड्यात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $62 पर्यंत घसरली. 7 एप्रिल, ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 63.23 होती. OPEC+ ने देखील या महिन्यापासून उत्पादन कपात शिथिल केली.
देशाच्या राजधानीत सोमवार, 7 एप्रिल रोजी पेट्रोल 94.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 87.62 रुपये प्रति लिटर आहे.
देशाच्या आर्थिक राजधानीत सोमवार, 7 एप्रिल रोजी पेट्रोलचा दर 103.44 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 89.97 रुपये प्रति लिटर इतका आहे.
कोलकातामध्ये सोमवार, 7 एप्रिल रोजी पेट्रोल 103.94 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 90.76 रुपये प्रति लिटर आहे.
सोमवारी, 7 एप्रिल रोजी चेन्नईमध्ये पेट्रोल 100.75 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.34 रुपये प्रति लिटर आहे.