Marathi

नागपुरी वऱ्हाडी चिकन रेसिपी

नागपुरी वऱ्हाडी चिकनची रेसिपी

Marathi

साहित्य

चिकन – ५०० ग्रॅम, कांदे – ४ मध्यम, टोमॅटो – २ मध्यम, आले-लसूण पेस्ट – २ टेबलस्पून, गरम मसाला – १ टीस्पून, तिखट – २ टेबलस्पून, हळद – ½ टीस्पून, धने-जिरे पावडर – १ टीस्पून

Image credits: Freepik-mrsiraphol
Marathi

वऱ्हाडी मसाला बनवण्यासाठी

कोरडे खोबरे – ४ टेबलस्पून, कांदा – १ मध्यम, लसूण पाकळ्या – ५, काळी मिरी – ८-१०, दालचिनी – १ तुकडा, लवंग – २, तमालपत्र – १, ओलं खोबरं (ऐच्छिक) – २ टेबलस्पून, सुकी लाल मिरची – २

Image credits: Freepik-timolina
Marathi

चांगलं परतवून घ्या

तेल गरम करून कांदे खरपूस परतून घ्या. त्यात आले-लसूण पेस्ट आणि टोमॅटो घालून परता. आता त्यात हळद, तिखट, धने-जिरे पावडर आणि मीठ घालून चांगलं परतून घ्या.

Image credits: Freepik-mdjaff
Marathi

वऱ्हाडी मसाला मुरून द्या

त्यात वऱ्हाडी मसाला आणि चिकन टाका. झाकण ठेवून चिकनला मसाल्याने मुरू द्या.

Image credits: Freepik-azerbaijan_stockers
Marathi

कोथिंबीर घालून जेवण सर्व्ह करा

थोडं पाणी घालून कुकरमध्ये ४ शिट्ट्या होईपर्यंत शिजवा. झारून त्यावर कोथिंबीर घालून गरमागरम भाकरी/पोळी/तांदळासोबत सर्व्ह करा.

Image credits: Social Media
Marathi

खास टिप

वऱ्हाडी चिकनची झणझणीत चव असते. गरजेनुसार तिखट कमी-जास्त करा. या चिकनबरोबर बाजरीची भाकरी किंवा पातळ भात अप्रतिम लागतो!

Image credits: Social Media

तुमचे Fatty Liver आहे का हे जाणून घ्या, ही आहेत लक्षणे, असा करा वेळीच उपचार

तुमची लहान मुले सिजनल भाज्या खात नाहीत, जाणून घ्या या सोप्या Tips

आज गुरुवारी नाश्ट्यात बनवा उडुपी स्टाईल झटपट रवा इडली, तांदुळ-उडीद दाळ भिजवायची गरज नाही

आज गुरुवारी १० मिनिटांत बनवा कुरकुरीत साबुदाणा वडा, उपवास न करणारेही खायला मागतिल