दिल्लीमध्ये मंकीपॉक्सशी संदर्भातील पहिला रुग्ण सापडला आहे. हा रुग्ण मंकीपॉक्स या आजाराला ग्लोबल हेल्थ इमर्जंसी घोषित केल्यानंतर मिळाला आहे.
या सापडलेल्या रुग्णाला वेगळ्या हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्याच्यावरील आजाराची खात्री करण्यासाठी सॅम्पल घेण्यात आले आहेत.
मंकीपॉक्स आजारात अंगावर लाल पुरळ येणे, ताप येणे, डोकेदुखी आणि पाठ दुखणे अशी लक्षणे दिसून येतात.
लक्षणांची सुरुवात संक्रमक रुग्णांच्या संपर्कात आल्यानंतर एक आठवड्यानंतर होते. पण काही लोकांमध्ये हे लक्षण २१ दिवसांपर्यंत दिसून येत नाहीत.
दाणे हे मन्कीपॉक्सचे पहिले लक्षण आहे. काही लोकांना ताप, घास दुखणे अशी लक्षणे दिसून येत असतात. दाणे हे संपूर्ण शरीरावर आल्यास खाजवायला सुरुवात होते.
मंकीपॉक्स आजार आहे का नाही, हे जाणून घेण्यासाठी PCR ही टेस्ट केली जाते. दाणे शरीरावर आल्यास त्यावरून नमुने घेतले जातात.