वर्ष 2022 मध्ये भारत सरकारकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार देशात एकूण 28 कोटी वाहने रजिस्टर्ड आहेत.
सरकारच्या रिपोर्ट्सनुसार, देशात रजिस्टर्ड वाहनांमध्ये 21 कोटी दुचाकी आणि 7 कोटीपेक्षा अधिक वाहने चारचाकी आहेत. यामध्ये पेट्रोल-डिझेल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश आहे.
बहुतांशजणांना प्रश्न पडतो की, भारतात खासगी वाहन खरेदी करण्यासाठी मर्यादा आहे का?
केरळात राहणाऱ्या एका 71 वर्षीय महिलेकडे 11 वेगवेगळ्या वाहने चालवण्याचा परवाना आहे.
खासगी वापरासाठी किती गाड्या खरेदी करू शकता याबद्दल भारतात मर्यादा नाही.
देशात कोणताही व्यक्ती आपल्या गरजेनुसार वाहन खरेदी करू शकतो.