Marathi

चपाती थेट गॅसवर भाजताय? आधी हे वाचा

सकाळच्या नाश्त्यात किंवा डाएट करणारे रात्रीच्या जेवणात चपाती खातात. चपाती चांगली फुगली की ती मऊ लागते आणि खायलाही सोपी जाते.

Marathi

पापडासारख्या कडक होतात

पण चपात्या नेहमीच अशा फुगत नाहीत. कणिक नीट मळली नाही किंवा पीठ चांगलं नसेल, तर चपात्या पापडासारख्या कडक होतात.

Image credits: others
Marathi

तुम्ही गॅसवर भाजता का?

म्हणूनच, चपात्या व्यवस्थित फुगाव्या आणि चांगल्या भाजाव्या यासाठी काही लोक त्या थेट गॅसच्या फ्लेमवर ठेवून भाजतात. पण असं करणं आरोग्यासाठी खूप चुकीचं आहे.

Image credits: others
Marathi

आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक

थेट गॅसवर भाजलेली चपाती खाल्ल्याने शरीरातील अवयवांचं नुकसान होऊ शकतं. ही गोष्ट 'जर्नल ऑफ एन्व्हायर्नमेंट सायन्स अँड टेक्नॉलॉजी'मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनातून समोर आली आहे.

Image credits: others
Marathi

विषारी वायू बाहेर पडतात

गॅस स्टोव्ह आणि गॅस ग्रिल पेटवल्यावर त्यातून कार्बन मोनोऑक्साइड आणि नायट्रोजन डायऑक्साइडसारखे विषारी वायू बाहेर पडतात. हे वायू शरीरासाठी खूप धोकादायक असतात.

Image credits: others
Marathi

कॅन्सरला कारणीभूत घटक

जेव्हा अन्नपदार्थ उच्च तापमानावर शिजवले जातात, तेव्हा त्यात 'कार्सिनोजेन्स' (Carcinogens) नावाचे कॅन्सरला कारणीभूत ठरणारे घटक तयार होतात. हे घटक शरीरासाठी अजिबात चांगले नाहीत.

Image credits: others
Marathi

कॅन्सर आणि हृदयरोग

चपात्या अशा थेट गॅसच्या फ्लेमवर भाजल्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. इतकंच नाही, तर श्वसनाचे आजार आणि हृदयाशी संबंधित आजारही होऊ शकतात.

Image credits: others

Tata Tiago EV: टाटाची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार कोणती माहितीये?

फ्लोरल सिल्व्हर डिझाईनचे आकर्षक पर्याय, पाहून पडाल प्रेमात

मराठी मंगळसूत्राच्या आकर्षक डिझाइन्स, पाहूनच व्हाल वेडे

१५ ऑगस्टला बाळी करा खरेदी, लूक पाहून व्हाल थक्क