Marathi

फक्त 4 दिवस बाकी!, मोफत Aadhaar Card अपडेटसाठी ऑनलाईन पद्धत जाणून घ्या

Marathi

१४ सप्टेंबरनंतर आधारकार्ड अपडेट करण्यासाठी मोजावे लागणार पैसे

आधारकार्ड अपडेट करायचे असेल तर आताच करुन घ्या नाही तर नंतर तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहे. १४ सप्टेंबरनंतर आधारकार्ड अपडेट करण्यासाठी नागरिकांना ५० रुपये द्यावे लागणार आहेत. 

Image credits: Social Media X
Marathi

आधार कार्ड या पद्धतीने ऑनलाईन अपडेट करा

१. आधार कार्ड अपडेट पोर्टलच्या https://myaadhaar.uidai.gov.in या संकेतस्थळावर जा

Image credits: Social Media X
Marathi

आधार कार्ड या पद्धतीने ऑनलाईन अपडेट करा

२. या पोर्टलवर तुमचा आधार क्रमांक आणि तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर पाठवलेला OTP वापरून लॉग इन करा.

Image credits: Social Media X
Marathi

आधार कार्ड या पद्धतीने ऑनलाईन अपडेट करा

३. यात असलेल्या तुमच्या आधारच्या तपशीलांचे पुनरावलोकन करा व यानंतर तुमची ओळख आणि पत्ता तपशील अपडेट करण्यासाठी तुमची प्रोफाइल तपासून घ्या.

Image credits: Social Media X
Marathi

आधार कार्ड या पद्धतीने ऑनलाईन अपडेट करा

४. जर तुम्हाला तुमचा पत्ता किंवा नंबर अपडेट करायचा असेल तर, ड्रॉप-डाउन मेनूमधून तुम्ही सबमिट करू इच्छित कागदपत्रे निवडा आणि तुम्हाला हव्या असलेल्या फाइल अपलोड करा.

Image credits: Social Media X
Marathi

आधार कार्ड या पद्धतीने ऑनलाईन अपडेट करा

५. या ठिकाणी आलेल्या सूचीमधून ओळख आणि पत्ता पुरावा ऑप्शन निवडून त्यात योग्य माहिती भरा.

Image credits: Social Media X
Marathi

आधार कार्ड या पद्धतीने ऑनलाईन अपडेट करा

६. तुमचे कागदपत्र हे २ एमबी पेक्षा कमी असावे याची खात्री करून निवडलेले दस्तऐवज जेपीजीई, पीएनजी, किंवा पीडीएफ फॉरमॅटमध्ये अपलोड करा.

Image credits: Twitter
Marathi

आधार कार्ड या पद्धतीने ऑनलाईन अपडेट करा

७. सर्व माहिती भरल्यावर ती योग्य आहे की नाही हे पुन्हा एकदा तपासून घ्या. यानंतर सबमिट बटन टॅप करून तुमची माहिती अपलोड करा.

Image Credits: iSTOCK