500 ग्रॅम गाजर आधी धुवून घ्या. त्यानंतर त्याचे बाहेरचे आवरण काढा. आता हे गारज नीट किसून घ्या. जाड किसायचे की पातळ हे तुमच्या आवडीनुसार ठेवा.
एका जाड बुडाच्या पॅनमध्ये किसलेले गाजर आणि दूध एकत्र करा. मध्यम आचेवर गाजर मऊ होईपर्यंत आणि दूध पूर्णपणे आटेपर्यंत (सुमारे 20-25 मिनिटे) शिजवा.
शिजलेल्या गाजरामध्ये 1 कप साखर घाला. साखर विरघळेपर्यंत आणि मिश्रण घट्ट होईपर्यंत चांगले मिसळा आणि शिजवा. साखर घालताना हळूहळू घाला. एकाच वेळी टाकू नका.
चवीसाठी 3-4 चमचे तूप घाला. सुगंधासाठी 1/2 चमचा वेलची पूड घाला. यामुळे गाजराच्या हलव्याचा छान सुंगध येईल. शिवाय गाजराचा हलवा खायला सॉफ्ट होईल.
एका वेगळ्या पॅनमध्ये, मूठभर चिरलेले बदाम आणि काजू तुपात सोनेरी होईपर्यंत तळा. गाजराच्या मिश्रणात मनुके आणि तळलेले ड्रायफ्रुट्स घाला.
इच्छित असल्यास, अधिक चवीसाठी 1/2 कप किसलेला खवा घाला. यामुळे गाजराच्या हलव्याला एक वेगळीच टेस्ट येते. खवा चांगल्या प्रतिचा घ्या.
हलवा घट्ट होईपर्यंत आणि पॅनच्या कडा सोडेपर्यंत मंद आचेवर शिजवत रहा. उरलेल्या तळलेल्या ड्रायफ्रुट्सने सजवा आणि गरमागरम सर्व्ह करा.
हिवाळ्यात दुधापासून घरच्या घरी शुद्ध तूप कसं बनवायचं?
लक्ष्मीसारख्या नातीला गिफ्ट करा गोल्ड कडा, पाहून सगळे पडतील प्रेमात
गोल्ड प्लेटिंग केलेलं सोनं कसं ओळखावं, जाणून घ्या पद्धत
या प्रकारचे जोडवे घातल्यास पाय दिसतील सुंदर, पर्याय घ्या जाणून