पंढरपूरच्या वारीत गेल्यानंतर वारकऱ्याच्या आयुष्यात कोणते बदल होतात?
Maharashtra Jun 25 2025
Author: vivek panmand Image Credits:social media
Marathi
वारी म्हणजे एक चालती भक्तिमय तीर्थयात्रा असते
वारी म्हणजे शुद्ध भावनेचं, श्रद्धेचं आणि आत्मशुद्धीचं प्रतीक. पंढरपूरच्या वाटेवर हजारो वारकरी चालत असतात – बाहेरून साधं वाटणारं हे आयुष्य, मनातून बदल घडवून टाकतं.
Image credits: social media
Marathi
चालत चालत आत्म्याशी संवाद सुरू होतो
वारीमध्ये तासंतास चालल्यावर शरीर थकतं, पण मन जागं राहतं. हाच वेळ असतो – स्वतःशी, आपल्या चुका, दुःख, यांच्याशी संवाद साधण्याचा. वारी ही फक्त चालणं नाही, ती अंतर्मनाची वाटचाल असते.
Image credits: social media
Marathi
अभंग, कीर्तन आणि सामूहिक भक्तीचा प्रभाव
"राम कृष्ण हरी" चा जप, संत तुकारामांचे अभंग, भजन-कीर्तन – यामुळे मन शुद्ध होतं. वैर, क्रोध, गर्व, लोभ यांचं विसर्जन होतं आणि वारकरी नव्यानं विचार करायला लागतो.
Image credits: social media
Marathi
वारकऱ्यांचा सहवास बांधिलकी शिकवतो
वारीत सर्वजण एकत्र जेवतात, राहतात, चालतात. जात, धर्म, वय, पैसा काहीच महत्त्वाचं राहत नाही. वारीतून वारकरी शिकतो – एकता, सहकार्य, आणि नम्रता शिकवतो.
Image credits: social media
Marathi
श्रमातून खरा भक्तिभाव साकार होत असतो
पावसात, उन्हात, चिखलात चालताना शरीर थकतं – पण मन अधिक कणखर होतं. वारी माणसाला शिस्त, सहनशीलता आणि श्रद्धा शिकवते.