विनोद कांबळी, भारताचा माजी क्रिकेटपटू, सचिन तेंडुलकरचा लहानपणीचा मित्र, आता गंभीर आजाराने ग्रस्त आहे. 3 आठवड्यांपूर्वी एका कार्यक्रमात त्याच्या प्रकृतीवर चिंता व्यक्त केली जात होती
21 डिसेंबर 2024 रोजी विनोद कांबळीला ठाण्याच्या आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्या शरीरावर ताण येण्याची आणि दुखापतीची तक्रार होती, त्यामुळे तात्काळ उपचार सुरू करण्यात आले.
कांबळीवर विविध तपासण्या केल्या गेल्या. प्रारंभिक चाचणीत यूरिनरी इन्फेक्शन आणि ताण याचा संकेत मिळाला. पण अधिक तपासणीनंतर त्याच्या मेंदूत रक्ताच्या गुठल्या झाल्या असल्याचे समजले.
डॉ. विवेक त्रिवेदी, कांबळीचे डॉक्टर, यांनुसार कांबळीच्या मेंदूत रक्ताच्या गुठल्या आढळल्या आहेत. या गंभीर स्थितीचे अधिक तपासणीसाठी डॉक्टरांनी त्याची विशेष काळजी घेतली आहे.
कांबळीने 2022 मध्ये खुलासा केला होता की, त्याचे एकमेव उत्पन्न स्त्रोत म्हणजे बीसीसीआयकडून मिळणारी पेन्शन. त्याला बीसीसीआयकडून दरमहा 30 हजार रुपये पेन्शन मिळते.
रुग्णालयाच्या प्रशासनाने कांबळीवर मोफत उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे त्याला आर्थिकदृष्ट्या दिलासा मिळाला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी विनोद कांबळी यांची भेट घेऊन चौकशी केली. त्यांनी डॉक्टरांशी चर्चा करून कांबळींवर उपचारात विशेष काळजी घ्या अशी विनंती केली.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कांबळी यांस ५ लाखाची मदत करण्याचे जाहीर केले. डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडून ही मदत देण्यात येणारय. आगामी काळात अजून मदत ते मदत करणार आहेत.
विनोद कांबळीवर सुरू असलेला उपचार यशस्वी होईल अशी आशा आहे. क्रिकेटविश्व आणि चाहत्यांनी त्याच्या लवकर सुधारण्याची प्रार्थना केली आहे.