लाडकी बहीण योजनेतून आतापर्यंत ५ हप्ते मिळाले आहेत. आता डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार ते आपण जाणून घेऊयात.
लाडकी बहीण योजनेनुसार अडीच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या महिलांना सरकारकडून पैसे देण्यात येतात. त्यानुसार महिलांना महिन्याला अडीच लाख रुपये देण्यात येतात.
लाडकी बहीण योजना हि जुलैपासून सुरु झाली. विधानसभा निवडणुकीत हा मुद्दा सर्वात आधी चर्चिला गेला होता.सरकारने महिलांना मोठ्या प्रमाणावर पैसे दिले होते .
महिलांना आता दर महिन्याला १५०० रुपये मिळणार आहेत. त्यांच्या खात्यात सरकारकडून हे पैसे दिले जाणार असून आता महिला त्याचीच वाट पाहत आहेत.
महिलांना २१०० रुपये देण्यात येतील असं महायुतीच्या वतीने सांगण्यात आलं होत, पण डिसेंबर महिन्यात १५०० रुपयेच देण्यात येणार आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना पैसे देण्याच्या बाबतीत एक मोठी घोषणा केली आहे. डिसेंबर महिन्यात त्यांना पैसे देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.