राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून, भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना खाती वाटप करण्यात आली आहेत. यापैकी राज्यमंत्र्यांना कोणती खाती मिळाली ते पाहुयात.
पुण्याच्या पर्वती मतदारसंघात सलग 4 वेळा निवडून आलेल्या माधुरी मिसाळ यांना ‘नगरविकास, परिवहन सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास व वक्फ’ हे खाते मिळाले आहे.
शिवसेना शिंदे गटाचे रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल यांना ‘वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधि व न्याय, कामगार’ या खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर यांना ‘सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालकल्याण, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)’ हे खाते मिळाले आहे.
दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांना ‘गृह(शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायतराज, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषधी प्रशासन’ हे खाते मिळाले आहे.
पुसदचे राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनील नाईक यांना ‘उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्रशिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृदा व जलसंधारण’ हे खाते मिळाले आहे.
वर्ध्याचे आमदार पंकज भोयर यांना ‘गृह(ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार, खनिकर्म’ या खात्याची जबाबदारी मिळाली आहे.