स्वप्नील कुसळे याने नेमबाजीमध्ये भारताला तिसरे पदक मिळवून दिले आहे. हे पदक मिळवून त्याने महाराष्टाचे नाव जगात गाजवले आहे.
स्वप्नील कुसळे यांचा जन्म ६ ऑगस्ट १९९५ रोजी झाला. ते कोल्हापूर जिल्हातील राधानगरी धरणाजवळ राहतात.
स्वप्नील हे २०१५ पासून रेल्वेमध्ये टीसी म्हणून काम करत आहेत. त्यांनी भोसले मिलिटरी कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले.
स्वप्नील कुसळे यांचे वडील शिक्षक आणि आई सरपंच आहेत.
स्वप्नील यांनी नेमबाजीचे करिअर सुरु केल्यानंतर त्यांच्याकडे गोळी घ्यायला पैसे नव्हते. त्यांच्या वडिलांनी आपल्या मुलाचे शिक्षण पूर्ण व्हावे यासाठी मेहनत घेतली आहे.