मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवार शायना एनसी यांचा पराभव झाला आहे. काँग्रेसचे अमीन पटेल हे येथून विजयी झाले आहेत.
तिवसा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार यशोमती ठाकूर यांचा पराभव झाला आहे.
अशोक चव्हाण यांची कन्या भाजपच्या श्रीजया चव्हाण या भोकर मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. त्यांनी काँग्रेसच्या तिरुपती कोंढेकर यांचा पराभव केला.
पर्वती मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार माधुरी मिसाळ यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अश्विनी नितीन कदम यांचा पराभव केला आहे.
श्रीवर्धन मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) उमेदवार आदिती तटकरे या विजयी झाल्या आहेत. त्यांनी राष्ट्रवादीचे (शरद पवार) अनिल दत्ताराम नवगणे यांचा पराभव केला आहे.
जिंतूर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार मेघना बोर्डीकर विजयी झाल्या आहेत. त्यांची लढत राष्ट्रवादीचे (शरद पवार) भांबळे विजय माणिकराव यांच्याशी होती.
चिखली विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार श्वेता महाले या विजयी झाल्या आहेत. त्यांनी काँग्रेसचे राहुल सिद्धविनायक बोंद्रे यांचा पराभव केला आहे.
अहेरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या (शरद पवार) उमेदवार भाग्यश्री आत्राम पराभूत झाल्या आहेत. राष्ट्रवादीचे (अजित पवार) धर्मरावबाबा आत्राम हे विजयी झाले आहेत.
धारावी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार डॉ. ज्योती गायकवाड या विजयी झाल्या आहेत. शिवसेनेचे राजेश शिवदास खंदारे यांचा त्यांनी पराभव केला आहे.
अक्कलकुवा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार डॉ. हिना विजयकुमार गावित पराभूत झाल्यात. शिवसेनेचे आमश्या फुलजी पाडवी हे विजयी झाले आहेत.