Marathi

दिग्गज 8 नेत्यांनी बजावला मतदान हक्क, तुम्ही घराबाहेर पडून करा मतदान

Marathi

अजित पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क

काटेवाडीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कुटुंबियांसमवेत विधानसभा निवडणूक मतदानाचा हक्क बजावला. जनतेनं घराबाहेर पडून आपला मतदानाचा मूलभूत हक्क बजवावा असे आवाहन त्यांनी केलं.

Image credits: social media
Marathi

भाजप नेते आशिष शेलार यांनीही बजावला मतदानाचा हक्क

भाजप नेते आशिष शेलार यांनीही मतदानाचा हक्क बजावला. लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी व्हा, आपला मतदानाचा हक्क नक्की बजावा. असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.

Image credits: social media
Marathi

नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं मतदान

नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी मतदान करा लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा असे आवाहन जनतेला केले आहे.

Image credits: social media
Marathi

खासदार सुप्रिया सुळे यांनी कुटुंबियांसमवेत केलं मतदान

बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ही मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यांनी राज्यातील मतदारांना घराबाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

Image credits: social media
Marathi

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी कुटुंबियांसोबत केलं मतदान

आज अतिशय उत्साहात कुटुंबियांसोबत शिर्डी विधानसभेतील जोर्वे येथे मतदान केले. आपण देखील मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आपले मतदानाचे कर्तव्य पार पाडावे असे आवाहन त्यांनी केलं आहे

Image credits: social media
Marathi

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केलं मतदान

माझ्या साकोली विधानसभा मतदारसंघात आज कुटुंबीयांसमवेत मतदानाचा हक्क बजावला. महाराष्ट्रातील प्रत्येक मतदाराने मतदानाचा अधिकार बजावावा, ही सर्वांना नम्र विनंती!

Image credits: social media
Marathi

युगेंद्र पवार यांनी कुटुंबियांसह केलं मतदान

बारामती विधानसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी कुटुंबियांसह कन्हेरी येथे मतदानाचा हक्क बजावला. बारामतीकर यंदा परिवर्तन घडवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Image credits: social media
Marathi

संग्राम थोपटे यांनी पत्नीसमवेत केलं मतदान

आज सकाळी हातनोशी येथील मतदान केंद्रावर जाऊन आपल्या भोर-राजगड-मुळशी विधानसभा मतदारसंघासाठी मतदानाचा हक्क बजावला. आपण ही आपल्या मतदारसंघाच्या उज्ज्वल भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावा.

Image credits: socaial media

Maharashtra Election 2024: हल्ला झालेले अनिल देशमुख कोण आहेत?

तो दिवस CM शिंदे विसरत नाहीत, त्यांची आठवण होताच वाहू लागतात अश्रू

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : काका-पुतण्या ते नवरा-बायको आमने-सामने

महाराष्ट्र भाजपचे व्हिजन 2029: चेहरामोहरा बदलणारी 7 मोठी आश्वासने