घाटकोपर पूर्व, मुंबई येथील भाजपचे उमेदवार पराग शहा विजयी झाले आहेत. ते सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. त्यांच्याकडे 3383 कोटीहून अधिक संपत्ती आहे.
पनवेलमधील भाजपचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांनी जवळपास ५० हजाराच्या मतांनी आघाडी घेत शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांना पराभूत केले. यांच्याकडे 475 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
मलबार हिलमधून भाजपचे मंगलप्रभात लोढा विजयी झाले आहेत. मंगल प्रभात मलबार हिलमधून भाजपचे उमेदवार आहेत. त्यांनी आपली संपत्ती 447 कोटी रुपये असल्याचे जाहीर केले आहे.
ओवळा माजिवडा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार प्रताप सरनाईक हे विजयी झाले आहेत. यांच्याकडे 333 कोटींहून अधिक संपत्ती आहे.
मानखुर्द शिवाजीनगरमधील समाजवादी पक्षाचे उमेदवार अबू असीम आझमी हे विजयी झाले आहेत. अबू असीम यांच्याकडे 309 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
पलूस-कडेगाव मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार कदम विश्वजित हे विजयी झाले आहेत. त्यांची संपत्ती 299 कोटी रुपयांहून अधिक असल्याचे जाहीर केले आहे.
पुरंदरचे काँग्रेसचे उमेदवार संजय चंदुकाका जगताप पराभूत झाले आहेत. यांची संपत्ती 277 कोटी रुपये आहे.
हिंगणा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार समीर दत्तात्रय मेघे विजयी झाले आहेत. ते 261 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्तीचे मालक आहेत.
परंडा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार तानाजी जयवंत सावंत हे विजयी झाले आहेत. यांनी आपली संपत्ती 235 कोटी असल्याचे जाहीर केले आहे.
नायगाव मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राजेश संभाजीराव पवार हे विजयी झाले आहेत. यांच्याकडे 212 कोटी रुपयांची संपत्ती आहे.