ठाण्याच्या पाचपाखाडी मतदारसंघातून ठाकरे गटाचे केदार दिघे पराभूत झाले आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भरघोस मतांनी विजयी झाले आहेत. दिवंगत नेते आनंद दिघे यांचे ते पुतणे आहेत.
बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार अजित पवार विजयी झाले. ते शरद पवारांचे पुतणे आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या युगेंद्र पवारांचा पराभव केला.
उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य ठाकरे हे वरळी मतदारसंघातून शिवसेनेचे (UBT) उमेदवार आहेत. आदित्य ठाकरे विजयी झाले असून त्यांनी मिलिंद देवरा यांचा पराभव केला आहे.
मिलिंद देवरा हे वरळी मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. ते मुरली देवरा यांचा मुलगा आहेत. तर वरळीतून आदित्य ठाकरे यांनी विजयी मिळवला आहे.
मनसे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. अमित ठाकरे हे पराभूत झाले आहेत.
कणकवली मतदारसंघातून भाजपचे उमेदवार नितेश राणे हे विजयी झाले आहेत. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे ते धाकटे पुत्र आहेत.
कुडाळ मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार नीलेश राणे हे विजयी झाले आहेत. ते नारायण राणे यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत.
लातूर शहरातून काँग्रेसचे उमेदवार अमित देशमुख हे विजयी झाले आहेत. ते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र आहेत. भाजपच्या अर्चना पाटील याचा पराभव केला आहे.
लातूर शहरातून अर्चना पाटील या पराभूत झाल्या आहेत. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार अमित देशमुख यांचा पराभव केला. शिवराज पाटील यांची सून अर्चना पाटील या आहेत.
धीरज देशमुख हे विलासराव देशमुखांचे धाकटे पुत्र आहेत. लातूर ग्रामीणमधून काँग्रेसचे उमेदवार धीरज देशमुख पराभूत झाले आहेत. तर भाजपचे रमेश कराड हे विजयी झाले आहेत.