राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार बारामती मतदारसंघातून विजयी झाले आहेत. त्याच्यावर 40 गुन्हे दाखल आहेत.
कणकवली मतदारसंघातील भाजपचे उमेदवार नितेश नारायण राणे हे विजयी झाले आहेत. यांच्यावर 38 गुन्हे दाखल आहेत.
पुरंदर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार संजय चंदूकाका जगताप यांच्यावर 27 गुन्हे दाखल आहेत. ते पराभूत झाले आहेत.
नागपूर मध्य मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार बंटी बाबा शेळके हे पराभूत झाले आहेत. यांच्यावर 26 गुन्हे दाखल आहेत.
श्रीगोंदा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार विक्रम पाचपुते हे विजयी झाले आहेत. ते 21 गुन्ह्यांमध्ये आरोपी आहेत.
मीरा-भाईंदर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार नरेंद्र मेहता हे विजयी झाले आहेत. यांच्यावर 18 गुन्हे दाखल आहेत.
उल्हासनगर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार) उमेदवार ओमी पप्पू कलानी हे 15 गुन्हेगारी प्रकरणात आरोपी आहेत. ते विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले आहेत.
अचलपूर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्यांच्यावर 15 गुन्हे दाखल आहेत. ते पराभूत झाले असून भाजपचे प्रवीण तायडे यांनी विजय मिळवला आहे.
मालेगाव बाह्य मतदारसंघातील शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार प्रशांत हिरे हे 14 प्रकरणांमध्ये आरोपी आहेत. दादा भुसे विजयी झाले असून प्रशांत हिरे पराभूत झाले आहेत.
सांगोला मतदारसंघातील शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार दिपकाबा यांच्यावर 14 गुन्हे दाखल आहेत. ते पराभूत झाले आहेत.