ठाण्याच्या पाचपाखाडी मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भरघोस मतांनी विजयी झाले आहेत, तर ठाकरे गटाचे केदार दिघे पराभूत झाले आहेत.
नागपूर दक्षिण पश्चिममधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दणदणीत विजय झाला आहे. तर काँग्रेसच्या प्रफुल गुडधे यांचा पराभव झाला आहे.
बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार अजित पवार विजयी झाले आहेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या युगेंद्र पवारांचा पराभव केला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी मतदारसंघातून भाजपच्या राधाकृष्ण विखे पाटील यांचा भरघोस मतांनी विजय झाला आहे, तर महाविकास आघाडीच्या प्रभावती घोगरे यांचा पराभव झाला आहे.
येवला विधानसभा मतदारसंघात मंत्री छगन भुजबळ विजयी झाले. 24 व्या फेरी अखेर 26 हजार 80 मतांची आघाडी घेतली. सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत 28 हजार 774 ने मताधिक्य कमी झाले.
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार बल्लारपूरमधून विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या संतोषसिंग रावत यांचा पराभव केला आहे.
पुणे जिल्ह्यातील कोथरुड मतदारसंघात भाजपच्या चंद्रकांत पाटील यांचा विजय झाला आहे, तर शिवसेना ठाकरे गटाच्या चंद्रकांत मोकाटे यांचा पराभव झाला आहे.
जळगाव जिल्ह्यातील जामनेर मतदारसंघात भाजपच्या गिरीश महाजन यांचा भरघोस मतांनी विजय झाला आहे, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या दिलीप खोडपे यांचा पराभव झाला आहे.
जळगाव ग्रामीण मतदारसंघातून शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी एसपी गटाच्या गुलाबराव देवकर यांचा पराभव केला.
बीडच्या परळी मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे धनंजय मुंडे विजयी झाले आहेत. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या राजेसाहेब देशमुख यांचा पराभव झाला आहे.