साताऱ्यातील कास पठार रंगबेरंगी फुलांनी बहरले आहे. पर्यटकांचे आकर्षण वाढले आहे!
सात वर्षांनी एकदाच फुलणारी टोपली कारवी, कंदील फुल, जेली फुल, व विविध दुर्मिळ फुले हे फुलली आहेत.
सुट्टीच्या दिवशी कास पठारावर मोठी गर्दी होते आहे. दुर्मिळ फुलांचे सौंदर्य पाहण्यासाठी हजारो पर्यटक येत आहेत.
युनेस्कोने कास पठाराला जागतिक पुष्प पठार म्हणून मान्यता दिली आहे. हे पर्यटकांचे आवडते स्थळ बनले आहे.
कास वन समितीने प्रत्येक व्यक्तीसाठी तिकीट १५० रुपये ठेवले आहे. ऑनलाइन बुकिंग करून येण्याची आवश्यकता आहे.
कास पठारावर येणारे पर्यटक फुलांच्या बहराचा आनंद घेत आहेत. सध्या दुर्मिळ फुलांचे सौंदर्य प्रत्येकाच्या हृदयात स्थान मिळवत आहे.
सातारा येथील कास पठार रंगबेरंगी दुर्मिळ फुलांनी बहरले आहे. ही बहरलेली फुलं पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे.