पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ सप्टेंबरला पुण्यात भेट देणार असून येथे ते २२,६०० कोटींच्या कामांचं उदघाटन करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जिल्हा न्यायालय मेट्रो स्टेशन येथून, ते जिल्हा न्यायालय ते स्वारगेट, पुणे येथे धावणाऱ्या मेट्रो ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील.
2,950 कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात येणाऱ्या पुणे मेट्रो फेज-1 च्या स्वारगेट-कात्रज विस्ताराची पायाभरणीही पंतप्रधान करणार आहेत.
भिडेवाडा येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पहिल्या कन्या शाळेच्या स्मारकाची पायाभरणी पंतप्रधान करणार आहेत.
भाजपने उद्याच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी केली आहे. विधानसभा निवडणूक जवळ येत असल्यामुळे नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याचा प्रचारासाठी उपयोग करून घेण्याचा पक्षाचा प्लॅन आहे.