पिकलेल्या केळ्यांपासून तयार करा Banana Bread
तीन पिकलेली केळी, एक तृतीयांश तूप किंवा तेल, तीन चतुर्थांश साखर, एक अंड, एक चमला व्हेनिला एसेंस, एक चमचा बेकिंग सोडा, चिमूटभर मीठ, दीड कप मैदा, अर्धा कप ड्राय फ्रुट्स, चॉकलेट चिप्स
ओव्हन 350 डिग्री सेल्सिअसवर आधीच गरम करून घ्या. ब्रेडसाठी 4X8 इंच आकाराचा ब्रेड पॅन घेऊन त्यावर बटर पेपर लावा.
केळ्याचा ब्रेड तयार करण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात पिकलेली केळी मॅश करून घ्या.
मॅश केलेल्या केळ्यांमध्ये तूप किंवा तेल मिक्स करून सर्व सामग्री व्यवस्थितीत मिक्स करा. यामध्ये साखर, फेटलेले अंड आणि व्हेनिला एसेंस या सर्व गोष्टी एकजीव होईपर्यंत मिक्स करा.
ब्रेडच्या मिश्रणात बेकिंग सोडा आणि मीठ टाका. मैदाही त्या मिश्रणात मिक्स करून जाडसर पीठ तयार करा.
केळ्याच्या ब्रेडला स्वादिष्ट चव येण्यासाठी त्यामध्ये ड्रायफ्रुट्स किंवा चॉकलेट चिप्सही मिक्स करा.
ब्रेडसाठी तयार करण्यात आलेले बॅटर ब्रेडच्या पॅनमध्ये टाकून सर्वत्र व्यवस्थितीत पसरवा. आता गरम ओव्हनमध्ये 50-60 मिनिटांपर्यंत ब्रेड भाजण्यासाठी ठेवा.
ब्रेड पूर्णपणे तयार झाला की नाही हे तपासून पाहण्यासाठी त्यात टुथपिक टाकून पाहा. ब्रेड भाजून झाल्यानंतर ओव्हनमधून बाहेर काढत थंड होऊ द्या. थंड झाल्यानंतर तो खाण्यासाठी सर्व्ह करा.