पतीने आयुष्यात पत्नीशिवाय ही 4 कामे करू नयेत, अन्यथा...
हिंदू धर्मात पत्नीला पतीची अर्धांगिनी म्हटले जाते. लग्नानंतर काही कामं पती-पत्नीने एकत्रित मिळून केली पाहिजेत.
लग्नात काही वचनं पती-पत्नी एकमेकांना देतात. यावेळी कोणती कामे पतीने एकट्याने करू नये याबद्दलही सांगितले जाते. याबद्दल जाणून घेऊया अधिक...
देवदर्शन पतीने एकट्याने करू नये. याचे फळ पतीला मिळणार नाही. धर्म ग्रंथांनुसार, पती-पत्नीने एकत्रित देवदर्शन करावे. यामुळे वैवाहिक आयुष्य सुखी राहते.
पूजा-आरती करताना पती-पत्नी एकत्रित असणे अत्यंत गरजेचे आहे. पत्नी पूजा करत असल्यास पतीने त्यावेळी तिच्या हाताला स्पर्श करून ठेवल्यासही पूजेचे फळ दोघांना मिळते.
पतीने कधीच एकट्याने कोणत्याही गोष्टीचे दान करू नये. पत्नीसोबत मिळून दान करावे असे धर्म ग्रंथांमध्ये सांगितले आहे. पत्नीशिवाय केलेल्या दानामुळे त्याचे संपूर्ण फळ मिळत नाही.
पती-पत्नीने कोणतेही शुभ कार्य एकत्रित करावे. विवाहित जोडप्यांशिवाय होम-हवन, यज्ञ करू नये हे देखील ग्रंथांत सांगितले आहे.
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.