यंदाच्या वर्षात या सिल्क साड्यांना महिलांची पसंती
यंदाच्या वर्षात महिलांनी गोल्डन वर्क थ्रेड साडीला पसंती दर्शवली आहे. ही साडी सध्या ट्रेण्डमध्ये आहे. गोल्डन वर्क थ्रेड साडीवर टेम्पल ज्वेलरी उठून दिसेल.
लग्नसोहळ्यासाठी मेटॅलिक सिल्क साडी सर्वाधिक उत्तम पर्याय आहे. या साडीचे फॅब्रिक अत्यंत मऊ आणि वजनाने हलके असते. या साडीवर सिंपल नेकलेस छान दिसेल.
साडीमध्ये काहीतरी हटके ट्राय करायची असल्यास नीता अंबानी यांच्यासारखी ही साडी ट्राय करू शकता. ही साडी पटोला सिल्क फॅब्रिकमध्ये येते.
प्युअर सॉफ्ट सिल्कपासून तयार केलेली ही डिझाइनर सिल्क साडी नेसल्यानंतर अतिशय सुंदर दिसते. रॉयल ब्ल्यू रंगातील साडी एखाद्या फंक्शनसाठी परिधान करू शकता. यावर मोठे झुमके छान दिसतात.
पिवळ्या रंगातील ही सिल्क साडी अत्यंत सुंदर दिसत आहे. सिल्क साडीवर बुट्टी असणारे डिझाइन केले आहे. पिवळ्या रंगाच्या या साडीवर कॉन्ट्रास्ट रंगाचे ब्लाउज शोभून दिसते.
क्लासी लुकसाठी आलिया भटसारखी रामा ग्रीन कलर साडी नक्की ट्राय करा. या हिरव्या रंगाव्यतिरिक्त अन्य रंगांचे ऑप्शनही तुम्हाला मिळतील.
पारंपरिक लाल रंगातील बनारसी साडीला महिलांनी यंदाच्या वर्षात पसंती दिली आहे. कोणत्याही लग्नसोहळ्यात बनारसी सिल्क साडी तुम्ही नेसू शकता. यावर सिल्व्हर रंगाची ज्वेलरी छान दिसते.
गुलाबी रंगाच्या शेडमधील सिल्क साडीमध्ये तुमचा लुक अधिक खुलला जातो. अशा साडीवर मोठे झुमके आणि गळ्यात हार छान दिसतो.
ऑरेंज रंगाच्या या शेडमधील साडी ही साडी मऊ सिल्क फॅब्रिकपासून तयार करण्यात आलेली आहे. मोठी बॉर्डर असणारी ही साडी तुम्ही कोणत्याही फंक्शनसाठी नेसू शकतात.
अशा प्रकारच्या गडद रंगातील स्टाइलिश साड्यांच्या डिझाइनला महिलांनी यंदाच्या वर्षात अधिक पसंती दिली आहे. या साड्यांमध्ये तुमचा लुक अधिक सुंदर आणि खुललेला दिसतो.