Lifestyle

Health

व्यायामापूर्वी कॉफीचे सेवन करावे की नाही?

Image credits: Getty

एनर्जी ड्रिंक

व्यायामापूर्वी शरीरात उर्जा असणे गरजेचे असते. यासाठी व्यायामापूर्वी एनर्जी ड्रिंक पिण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. एनर्जी ड्रिंकमुळे शरीरातील चयापचयाची क्रिया वेगाने होते. 

Image credits: Getty

ब्लॅक कॉफी

बहुतांशजण व्यायामापूर्वी ब्लॅक कॉफी पितात. पण खरंच ब्लॅक कॉफी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असते का? याचबद्दल जाणून घेऊया.

Image credits: Getty

फॅट बर्न होतात

व्यायामापूर्वी ब्लॅक कॉफी प्यायल्याने चयापचयाचा दर बूस्ट होतो आणि शरीरातील फॅट बर्न होण्यास मदत होते.मर्यादित प्रमाणात कॉफी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.

Image credits: Getty

स्नायू दुखणे

व्यायाम करण्याच्या अर्धा तास आधी साखर मिक्स न करता ब्लॅक कॉफी प्यावी.यामुळे स्नायू दुखण्याच्या समस्येपासून आराम मिळतो.

Image credits: Getty

थकवा दूर होतो

ब्लॅक कॉफी प्यायल्याने व्यायामादरम्यान शरीरातील उर्जा कायम टिकून राहते. याशिवाय थकवा दूर होतो आणि तुम्ही उत्साहित राहता. 

Image credits: Getty

पचनासंबंधित समस्या

व्यायामापूर्वी दररोज कॉफी प्यायल्याने शरीरात कॅफीनचे प्रमाण वाढले जाते. यामुळे झोप न लागणे, अ‍ॅसिडिटी, एंझायटी आणि पचनासंबंधित समस्या होऊ शकते.

Image credits: Getty

शरीरात उर्जेची कमतरता

व्यायामापूर्वी दुधाची कॉफी प्यायल्याने शरीराला उर्जा मिळण्याऐवजी कमी होऊ शकते. याशिवाय दूधाच्या कॉफीमुळे वजन देखील कमी होणार नाही.

Image credits: Getty

व्यायामापूर्वी कोणते ड्रिंक प्यावे?

व्यायामापूर्वी कोणते ड्रिंक प्यावे असा प्रश्न प्रत्येकालाच पडतो. पण कॉफीऐवजी ग्रीन टी, फळांचा ज्युस, नारळाचे पाणी अथवा डिटॉक्स ड्रिंकचे सेवन करू शकता.

Image credits: Getty

तज्ज्ञांचा सल्ला

Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Getty